असा असून त्याकरीताच खा. राहुल गांधी हे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत." सदहू भारत जोडो यात्रे करीता कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे सर्वच आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया, काँग्रेसचे प्रदेश सदस्य दिलीप भोजराज, प्रदिप वानखडे, कॉंग्रेस सेवादलाचे समन्वयक अॅड संदेश जिंतुरकर, निष्ठावंत कार्यकर्ते राजिक शेख, अॅड सुभान खेतीवाले, रमेश पाटील लांडकर, राजु लाहोटी , रामबकस डेंडूळे, प्रकाशआप्पा निंबलवार, राजाभाऊ डोणगावकर, अमिर पठाण, उमेश शितोळे,रमेश पाटील मुंदे, राज चौधरी, कनिराम जाधव, अशोक वानखडे, संजय राठोड, गोविदराव मुंदेकर, जट्टावाले, जुम्मा पप्पूवाले यांच्या नेतृत्वात वाशिम येथे रवाना झाले असून उद्या दि . १५ नोहेंबर रोजी ते हिंगोली ते वाशिम मार्गावर कन्हेरगाव येथून भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत .

शिवाय वृत्त संकलनाकरीता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पत्रकार संजय कडोळे हे सुद्धा सहभागी होणार आहेत . वाशिम जिल्हा कॉग्रेस कमेटी तर्फे जिल्हाध्यक्ष आ अमित झनक, ज्येष्ठ नेते अॅड दिलीपराव सरनाईक, कृष्णराव देशमुख यांचे नेतृत्वात त्यांचे भव्य स्वागत होऊन यात्रेला अकोला जिल्हयापर्यंत वाशिमकरांकडून पोहचविले जाणार असल्याचे वृत्त आहे.