अरुण चहारे मुलाचे आष्टी तालुक्यांतील मोर्शी या गावाचे रहिवासी असून त्यांनी ब्रम्हपुरी येथील वनविभागात काम केले आहे . ब्रम्हपुरी येथून बदली चंद्रपूर ला झाल्याने ते चंद्रपूर येथील वन विभाग येथे नोकरीवर कार्यरत आहेत.
त्यांना समाजा विषयी सहानुभूती असल्याने ते समाज कार्य करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून २२ नोव्हेंबर २०२२ ला अरुण चहारे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सपत्नीक चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदान केले.
नेत्र दान केल्याने त्यांच्या मुळे दुष्टी हिन असलेल्यांना दृष्टी मिळण्यास मदत होऊन त्यांना आयुष्यातील खरेरंग पाहायला मिळणार असल्याने मानवसेवेचे हे महान सत्कार्य मृत्यूपूर्व करत असल्याचे आनंद या दांपत्यास असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अरुण चहारे व त्यांच्या पत्नी यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे येऊन नेत्र दानाचे पुण्य काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.