बाेडधा - हळदा येथील ग्राम विकास शिक्षण संस्था पारडगांव संचालित ज्ञानगंगा विद्यालयाचा ९०.४७ टक्के निकाल लागला.यामध्ये प्रवृत्ती देविदास धानाेरकर ही ८५.२० टक्के गुणांसह प्रथम आली आहे.
या निकालात प्राविण्य श्रेणीत १२ विद्यार्थी,प्रथम श्रेणीत १६ विद्यार्थी,द्वितीय श्रेणीत ६ विद्यार्थी,तृतीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रवृत्ती देविदास धानाेरकर ही ८५.२० टक्के गुणांसह प्रथम, जानवी काेरडे ८३.२० टक्के गुणांसह द्वितीय,८२.६० टक्के गुणांसह प्राची आष्टेकर तृतीय आली आहे. शाळेतर्फे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक जे.के.ठाकरे यांनी विद्यार्थी व पालकांना पुष्पगुच्छ दिले.तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण संस्था पारडगांवचे अध्यक्ष पी.एस.ताेंडरे,सचिव आर.बी.विधाते,उपाध्यक्ष डी.आर.रेहपाडे,सहसचिव डी.व्ही.मैंद,काेषाध्यक्ष आर.डी.ठाकरे,सदस्य-एन.जे पत्रे,एच.के.तुपटे,पी.बी.राऊत,पी.पी.पत्रे,शाळेचे मुख्याध्यापक जे.के.ठाकरे , खाेब्रागडे, दडमल, घाेडीचाेर,उईके आदी शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.