लोकप्रिय खा. भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त, दिव्यांग सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या योजनेअंतर्गत कारंजा (लाड) तालुक्याच्या शहरी व ग्रामिण भागातील सर्वच गरजू दिव्यांगांना, १००% मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वितरणाच्या नोंदणी करीता, दि.५ मे २०२३ रोजी स्थानिक महाविर ब्रम्हचर्याश्रम,चंदनवाडी समोर कारंजा (लाड) येथे पूर्वनियोजित दिव्यांग नोंदणी शिबिर संपन्न झाले.या शिबिरास कारंजा शहर व तालुकयातील दिव्यांग माहिला व पुरुषांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला असून,शिबिरात एकूण ५२५ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली असता,त्यापैकी ४०५ दिव्यांग लाभार्थी पात्र ठरले आहेत. या पात्र ठरलेल्या लोकांना खा.भावना ताई गवळी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप करण्यात येईल असे त्यांना कळविण्यात आले आहे.
उल्लेखनिय म्हणजे खा.भावनाताई गवळी यांनी स्वतः उपस्थित राहून दिव्यांगांच्या भेटी गाठी घेत त्यांच्याशी आपुलकीने चर्चा करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या यशस्वी शिबिराचे आयोजन शिवसेना कारंजा शहर व तालुका पक्ष संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला पंचायत समिती कारंजाचे गटविकास अधिकारी पडघान व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. कार्यक्रमाला, पंचायत समितीचे सभापती,गट विकास अधिकारी,गट शिक्षण अधिकारी,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय खांझोडे,महिला जिल्हा प्रमुख सौ.वैशालीताई येळणे,उपजिल्हा प्रमुख भागवत गवळी,उपजिल्हा प्रमुख मनोज पाटील दहातोंडे, तालुका प्रमुख मंगेश पाटील मूंदे,शहर प्रमुख अरुण बिकड यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने, प्रचंड उत्साहाने शिवसैनिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी मोलाची कामगिरी बजावली. असे वृत्त शहर प्रमुख अरुण बिकड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.