कारंजा : कारंजा डॉक्टर असोसिएशन,कारंजा तालुका वकील संघ व कारंजातील विविध सेवाभावी संस्था महिला मंडळी, पर्यावरण संस्थेच्या महीला यांच्यावतीने महिलांवरील अत्याचाराच्या विरुद्ध संवेदना म्हणून कारंजातील मुख्य मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले या संदर्भात कारंजा बार असोसिएशनच्या वतीने भारताचे राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांच्याकडे कारंजा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत वाढत्या स्त्री अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात अधिक सशक्तपणे कायदे करून पावली उचलावीत म्हणून निवेदन सादर करण्यात आले
सपूर्ण देशात व राज्यात महीला - अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगार व विकृतीवृत्तीस सद्याचे कायदे वचक निर्माण करण्यास असमर्थ ठरत आहे. कायद्याची योग्य रितीने अमेल बजावणी होत नाही- राज्यातील दिवसेंदिवस बेपत्ता होत असलेल्या महीला-मुलींचे प्रमाण देखिल अधिक होत आहे.
त्यामुळे महील व मुखीचे जीवनच असुरक्षित व भयग्रस्त झाल्याने मुलींनी रोजगार, शिक्षणासाठी बाहेर पडूच नये का ? अशी स्थिती देशात निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. या अकार्यक्षम कुचकामी शासन यंत्रणेला स्त्री अत्याचारांवर नियंत्रण आणण्यात अपयश आलेले असून सरकारने यासाठी अधिक सशक्तपणे वेळीच पाऊले उचलावीत.

देशाती, राज्यातील स्त्री विरोधी अत्याचाराच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला अशी मागणी कारंजा उपविभागीय अधिकारी यांना कारंजा विजीज्ञ मंडळाच्या वतीने यासंबंधीचे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी कारंजा मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट ॲड निलेश कानकिरड, ॲड डिके पिंजरकर ॲड अरुण खंडागळे उपाध्यक्ष ॲड ज्योती बाजड, ॲड स्वप्निल नायसे सचिव , ॲड शितल कानकिरड, ॲड अनिता राठोड, कु. वासनिक नितल रामटेके, प्रीती नांदे, माधुरी राऊत, सायमा शेख,विधीज्ञ सुभान खेतीवाले, संजय कडोळे, मुकेश बाबरे ॲड निलेश बोरकर,अनिल पवार, आतिश चौधरी, सतीश कानतोडे ॲड फारुख खान, एम.पी ठाकरे गणेश गुजर ॲड सुमंत बंडाळे, डीडी डाखोरे, ॲड मिलिंद खंडारे, मेघशाम ठाकरे, राहुल मनवर, सागर वासनिक श्रीकांत चौधरी आवेश शेख पंकज सावळे इत्यादी मंडळी या निवेदन देते वेळी हजर होत्या. अशी माहिती ॲड निलेश कानकिरड यांनी महाराष्ट्र राज्यसारिय पत्रकार परिषद कारंजा कडे कळवीली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....