राज्यात आगामी होणाऱ्या महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन जनता दलाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या दृष्टिकोनातून राज्यात बहुजन जनता दलाच्या वतीने मतदार कार्यकर्ता व सदस्य नोंदणी राज्यस्तरीय अभियानांतर्गत शनिवार दिनांक 21/5/2021रोजी अकोला येथील जनता बाजार समोरील असलेल्या व्हीआयपी विश्रामगृह येथे बहुजन जनता दल राज्यस्तरीय कार्यकर्त्यांची निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत असे बहुजन जनता दलाचे विदर्भ अध्यक्ष नागोराव पाटील आणि अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष गवई यांनी संयुक्तपणे सांगितले आहे
बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे हे विदर्भातील बहुजन जनता दलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यासोबत आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा करून विचार विनिमय करणार आहेत आणि बहुजन जनता दलाचा राज्यात वाढत्या प्रभावामुळे बहुजन जनता दलाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या सोबत चर्चा करणार असून बहुजन जनता दलामध्ये विविध राजकीय पक्षाचे आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत सुद्धा या बैठकीमध्ये पंडित भाऊ दाभाडे चर्चा करून त्यांना बहुजन जनता दलामध्ये प्रवेश देणार आहेत, राज्यातील ज्या नागरिकांना बहुजन जनता दलामध्ये जाहीर प्रवेश करायचा आहे किंवा सक्रिय सदस्य व्हायचे आहे त्या नागरिकांनी बहुजन जनता दलाच्या राज्यातील जिल्हाप्रमुख शहर प्रमुख तालुकाप्रमुख सर्कल प्रमुख विभागीय प्रमुख शाखाप्रमुख आणि सर्व आघाडीच्या जिल्हाप्रमुख यांच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त नागरिकांना बहुजन जनता दलामध्ये सामील करून घेणे यांच्यासह विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे तेव्हा बैठकीला विदर्भातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे विदर्भ अध्यक्ष नागोराव पाटील आणि अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष गवई यांनी केले आहे