कारंजा (लाड) : तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना केवळ वाचनासाठी नव्हे तर अभ्यासाकरीता पुस्तके उपलब्ध व्हावीत.ह्या दृष्टिकोनातून, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी, विद्यार्थी,महिला व नागरिकांकरीता मोफत मुक्तद्वार वाचनालयाची कल्पना मांडलेली होती. व त्यामुळे अनेक विद्यार्थ्याचे उच्च शिक्षण वाचनालयातूनच होत गेले. त्यामुळे देशांतर्गत शहरी व ग्रामिण भागात वाचनालयाचा विकास होत गेला. काही वर्षांपूर्वी सद्यस्थितीत कारंजा येथे शहर पोलीस स्टेशन समोर भगवान महावीर वाचनालया करीता सुसज्ज इमारत बांधण्यात आली. मात्र नगर पालिका कार्यालयाच्या विविध विभागांना जागा कमी पडत असल्याने आणि जुनी इमारत मोडकळीस आल्याने, गेल्या काही वर्षापूर्वी,स्वतः नगर पालिकेने आपल्या विविध विभागाच्या व्यवस्थापनाकरीता,भगवान महावीर वाचनालयाचे इमारतीमध्ये अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे वृत्तपत्र वाचक आणि स्पर्धा परिक्षा व उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थीनी यांची सपशेल गैरसोय होत असून त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अखेर गुरुवार दि 30 मे 2024 रोजी,भगवान महावीर वाचनालयाचे विद्यार्थी आणि वाचक मंडळीनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसिलदार, मुख्याधिकारी नगर पालिका कारंजा यांना निवेदन देवून, भगवान महावीर वाचनालय वाचक विद्यार्थी यांचेकरीता सुरळीतपणे नियमीत रित्या सुरु करण्यात यावे. व वाचक विद्यार्थी यांची गैरसोय दूर करावी याकरीता निवेदन दिले आहे. तरी वाचक विद्यार्थी यांच्या निवेदनावर स्थानिक नगर पालिका काय कार्यवाही करणार ? वाचकांच्या हक्काची जागा महिला व युवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार काय ? आणि वेळापत्रकाप्रमाणे वाचनालय सुरू ठेवणार काय ? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असल्याचे युवा समाजसेवक अब्दुल राजिक शेख तथा दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.