अकोला लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय भाऊ धोत्रे यांची मागणीची दखल घेऊन मुर्तीजापुर रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचा संकल्प करण्याच्या दृष्टीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील 35 रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा संकल्प केला असून यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातील मुर्तीजापुर समावेश असून अकोल्याचे खासदार व माजी पहिले शिक्षण राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून२६ फरवरी सोमवार रोजी सकाळी साडेदहा वाजता ऑनलाईन कार्यक्रम होत असून विकास कामाचा शुभारंभ सोबत देशभरातील रेल्वे पूल तसेच विविध ब्रिज विविध लोक विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन सोहळा होत असून अकोला रेल्वे स्टेशनचा विकास सुरू असताना मुर्तीजापुर येथील रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आता विस्तारीकरणासोबत नागपूर भुसावळ तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्याचा काम होऊन जलद गतीने विकास करण्याच्या दृष्टीने उचलत असून खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
या मतदारसंघातील लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्फत रेल्वे मंत्रालयाकडे मांडत होते मुर्तीजापुर रेल्वे स्टेशन मोठ्या प्रमाणात रेल्वेला व्यवसाय देणारा रेल्वे स्टेशन म्हणून मानला जातो.
सव्वीस फरवरी रोजी सकाळी साडेदहा ते सव्वा बाराच्या दरम्यान हा भव्य दिव्य कार्यक्रम मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन परिसरात होणार असून ऑनलाईन या कार्यक्रमाचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ऑनलाइन कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वतीने अनुप धोत्रे मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावर राहणार आहे.
खासदार संजय भाऊ धोत्रे यांचा वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा व मुर्तीजापुर शहराच्या विकासाला गती देणारा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन समस्त मतदारांचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया आमदार हरीश पिंपळे यांनी दिली.
अत्याधुनिक सुविधा युक्त ओ झाल्यामुळे रोजगार सोबत अनेक संधी उपलब्ध होणार आहे व रेल्वे प्रवासांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे यासाठी देशाची पंतप्रधान व दूरदृष्टी ठेवणारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रावसाहेब दानवे व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन व आभार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केले आहे.
अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार रणधीर सावरकर सातत्याने प्रयत्नशील राहतात त्यांना आपले लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने जिल्हाचा विकास एकमेव लक्ष घेऊन आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून मतदारांना दिलेली वचन पूर्तता करण्यात सदैव तत्पर राहणारे व सर्व सामान्यांच्या समस्या निराकरणासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या पदचिन्हवर त्यांच्या मार्गदर्शनात सदैव तत्पर राहणारे नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वात विकासाला चालना देणारा या रेल्वे बजेट मधील अमृत योजनेअंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा विकास हा जिल्हा प्रेरणादायी असल्याचीही अनेक नागरिकांनी अभिनंदन सरकारचे केले आहे.