कारंजा : कारंजा ते धनज शेलू-साखरा ते अमरावती मार्गा लगत असलेल्या , माजा भिवरी शिवारात दि 21,22 रोजी झालेल्या धुवाँधार पावसामुळे, अनेक शेतकर्याच्या, अल्पभूधारकांच्या शेतजमिनी पावसामुळे खरडून गेलेल्या असून, काहींच्या शेतामध्ये, पावसाच्या पाण्यामुळे तलाव सदृश्य पाणी साचलेले आहे. त्यामुळे येथील शेतकर्याची हिम्मत खचली असून, आपल्या डोळ्यादेखत बहरलेले पिक उध्वस्त झाल्याने त्यांच्या अश्रूंचा बांध सुटलेला आहे. नागलवाडी, भिवरी या गावातील शेतकऱ्यांसह,अल्पभूधारक हिम्मत मोहकर,संजय सोळंके, अविनाश सोळंके, जितेंद्र सोळंके, सिध्देश्वर जाधव, सविता जाधव, देवराव जाधव इत्यादीचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकरी हिम्मत प्रभाकर मोहकर, जयश्री हिम्मत मोहकर व हिमांशू हिम्मत मोहकर रा.नागलवाडी ता. कारंजा, यांचे भिवरी ता.कारंजा जि.वाशीम येथील मौजा भिवरी ग.नं.१३२ ही शेती मधील सोयाबीन व तूर पिकांचे सुद्धा सतत पडणाऱ्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे . सद्य परीस्थितीतही शेतात पाणी साठलेले आहे.तुर पूर्ण जळालेली आहे. ही एकूण 10 एक्कर शेती असून त्यात त्यांची 2 एक्कर तूर व बाकी सोयाबीन आहे.आपले बहरलेले पिक नष्ट झाल्याने ते चांगलेच हादरलेले आहेत.आधीच शेतकरी उशीरा आलेल्या पावसाने हताश आलेला होता आणि त्यात अतिवृष्टीमुळे आणखी भर पडली. कर्ज काढून शेतीच्या लागवडीला लागलेला पैसाही निघने कठीण झाले आहे. त्यामुळे संबधित तहसिलदार, कृषी अधिकारी, तलाठी यांनी नुकसानग्रस्त शेतजमीनीची पाहणी करून,पंचनामे करून, मायबाप शासनाकडून काही मदत मिळेल या आशेवर शेतकरी लक्ष ठेवून आहे.