कारंजा पत्रकार मंच कारंजाकडून आज दि.१४ एप्रिल २०२२ रोजी कार्यालयात, भगवान वर्धमान महाविर तथा विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा सी . पी . शेकुवाले हे होते . तर प्रमुख अतिथी मुख्याध्यापक विजय भड गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते विलास डोंगरे तथा कारंजा पत्रकार मंचाचे अध्यक्ष दै हिन्दुस्थान ता . प्रातिनिधी दिलीप पाटील रोकडे हे होते . सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले .यावेळी प्रा.शेकुवाले यांनी "डॉ .बाबासाहेब यांनी शिक्षणाला वाघीणीचं दूध समजून आपलं संपूर्ण जीवनच शिक्षण मिळविण्यासाठी खर्ची घातलं व प्रखर अभ्यासाअंती प्रजासत्ताक देशाला राज्यघटना देऊन सर्वांना समान आधिकार दिले . त्यामुळे पत्रकारांनी गरजू विद्यार्थ्याना शिक्षणात मदत करावी व पुढील पिढी सुशिक्षित करावी असे सांगीतले . तर "जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थकर भगवान वर्धमान महाविर आणि मानवतेची / समतेची शिकवन देणारे स्वतंत्र भारताचे भाग्यविधाते विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येणे हा सुवर्णयोग असल्याचे प्रतिपादन करीत त्यांची शिकवण आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे मत आपल्या संभाषणातून कारंजा पत्रकार मंचाचे सल्लागार तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले." कार्यक्रमाचे संयोजन विलास राऊत यांनी केले . कार्यक्रमाला चाँद मुन्निवाले विजय पाटील खंडार, डांगुर, अनिकेत भेलांडे, जहिरभाई, किरण क्षार, विजय गागरे, उमेश अनासाने इत्यादी उपस्थित होते .मोहम्मद मुन्निवाले यांनी समारोपिय संभाषण केले .