तालुक्यातील चौगान येथील राधेश्याम सुर्यकांत बुराडे (वय ८ वर्ष) हा मागील काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या वर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र डाॅक्टरांनी आता पोटावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली.
सदरची बाब राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळताच त्यांनी आपल्या कडून सदर मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली.
सदरची आर्थिक मदत देतांना चौगान येथील सरपंच उमेश धोटे, अनिल वैरागडे व इतर मान्यवर उपस्थित होते.