वाशीम सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी जारी केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीवरून तपशिलवार याप्रकारे जिल्हयात लहान मुले बालमजूरी करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विशेषतः उसतोड, विटभट्टी इत्यादी उद्योगात / कामाच्या ठिकाणी बाल कामगार काम करीत असल्याचे आढळल्यास बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६, सुधारणा २०१६, कलम ३ व ३ (अ) नुसार फौजदारी गुन्हा ठरतो. संबंधीत मालक, मुख्य मालक, कंत्राटदार यांच्याविरुध्द या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. कलम १४ नुसार संबंधीत मालक, मुख्य मालक, कंत्राटदार दोषी आढळल्यास ६ महिने ते २ वर्ष किंवा २० हजार ते ५० हजार रुपये किंवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे जिल्हयातील सर्व आस्थापनाधारकांनी आपल्या आस्थापनेवर बाल कामगार कामावर ठेवूनये. बाल कामगार काम करीत असल्याचे आढळुन असल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहनही दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.