जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथील रहिवासी व अकोला जिल्ह्यातील मराठा योद्धा,मराठाभूषण, ज्येष्ठ समाजसेवक , संयोजक, निर्भय बनो जनआंदोलन गजानन ओंकारराव हरणे यांच्या गेल्या 35 वर्षाची सामाजिक, कार्याची दखल घेऊन व यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल, त्यागाबद्दल व त्यांनी केलेल्या मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणामुळे, आंदोलनामुळे समाजात नवचैतन्य व जागरूकता निर्माण झाल्यामुळे समाजासाठी केलेल्या त्यागासाठी मराठा समाज भूषण मराठायोद्धा समाजसेवक गजानन हरणे यांचा साईबाबा जिनिंग फॅक्टरी वाशिम रोड पातुर जिल्हा अकोला येथे भव्य दिव्य सत्कार करून गौरव, सन्मान राज्यस्तरीय युवा संमेलनात भारतीय युवा काँग्रेस आउटरिचेल सेल महाराष्ट्र राज्याच्या वतीने आमदार चांडीजी ओमन , राष्ट्रीयअध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस आऊट रिचल सेल भारत, डॉक्टर शफिक महाराष्ट्र अध्यक्ष युवक काँग्रेस आउट रिचल सेल, अशोक अमानकर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, रवी पाटील अरबट जिल्हाध्यक्ष किसान सेल काँग्रेस अकोला , बुहरान ठेकेदार, महेंद्र गवई, मो. अशिम अली, हाजी कमोरोधिन, मुस्कान शहा, शब्बीर भाई, नाना देशमुख, हाजी कमरउद्दीन, प्रमोद डोंगरे, आदि मान्यवरांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार गौरव करण्यात आला. यावेळी आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मराठा योद्धा गजानन हरणे यांचा गुनगौरव करून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवक युव ती मोठ्या संख्येने उपस्थितती होती.