कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- दिनांक 25 रोजी कारंजा येथे भाजपा जनसंपर्क अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती घरोघरी पोहचविणारे जनसंपर्क अभियान आमदार राजेन्द्र पाटणी साहेब यांनी कारंजा शहरातील रामा सावजी यांच्या घरापासुन ते पोहा वेस पर्यंतच्या भागात राबविले. कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार मा.श्री .राजेंद्र पाटणी साहेब यांनी आज या क्षेत्रातील घरोघरी जाऊन लोकांना आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी केंद्रात त्यांच्या सरकारमार्फत लोकांसाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती पत्रके देऊन सांगितले तसेच यावेळी भेट घेतलेल्या नागरिकास माहिती देताना माननीय नरेंद्र मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी म्हणून पत्रकावर असणाऱ्या नंबर वरून मिस कॉल देण्यास सांगून मोदीजी करिता लोकांचे समर्थन यावेळी मिळविले. नागरिकांनी या अभियानास प्रतिसाद देत लोकप्रतिनिधींचे विकासकामांविषयीचे विचार ऐकून घेतले व अनेकांनी यावेळी आमदार पाटणी साहेब यांच्या सोबत फोटो घेतले.भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला केंद्रात ९वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी घर घर जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या सोबत भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.राजीव काळे, भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक यांच्यासह तालुका व शहर पदाधिकारी, मोर्चा, आघाडी, सेल , युवा मोर्चा, महीला मोर्चा,पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कारंजा तालुक्यात अभियान राबविण्यात येत असुन कार्यकर्ते घरोघरी जाऊन जन संपर्क अभियान कारंजा शहरात , तालुक्यातील ग्रामीण भागात राबवीत आहेत.या जनसंपर्क अभियान अंतर्गत कामांची माहती देताना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत रेशन वाटप, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळाली, आज पाणी 11.8 कोटी घरापर्यंत त्याचे पाणी पोहोचले आणि शंभर टक्के घरांमध्ये वीज पोहचली, 48.3 कोटी जनधन खाते उघडून गरिबांना बँकिंग प्रणालीमध्ये सामावून घेतले, आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10%टक्के आरक्षण सुनिश्चित केले गेले, प्रधानमंत्री स्वानीधी योजनेअंतर्गत 34 लाख पथारी विक्रेत्यांना कर्ज वाटप.

प्रधानमंत्री किसान योजना अंतर्गत 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक मदत, प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत 37.5 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी, MSP मध्ये ऐतिहासिक वाढ (खर्चापेक्षा 50 टक्के अधिक MSP) आणि 2013 _14 ते 2022-23 कृषी बजेट मध्ये5.6 पट वाढ, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत चार कोटी शेतकऱ्यांना मिळाले 4.7 लाख कोटी रुपयांचे कर्ज, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 57 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला, 390 नवीन विद्यापीठे, 7 नवीन IIT आणि 7 नवीन IIM आय एम ची स्थापना,15 AIIMS आणि 225 वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, प्रधानमंत्री श्री योजनेअंतर्गत 14 ,500 शाळांचा विकास, प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत 1.37कोटी युवक प्रशिक्षित, देशात एक लाख स्टार्टअप्स आणि 100 + युनिकॉर्न, रोजगार मेळावे अंतर्गत 71,000 हुन नियुक्ती पत्रांचे वितरण, महिला सक्षमीकरणाकरिता- प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत 9.6 कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.72 कोटी शौचालय बांधने, स्टॅन्ड अप इंडिया च्या लाभार्थ्यांपैकी 81 टक्के महिला आहेत, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 27.6 कोटी महिला लाभार्थ्यांना मिळाले कर्ज, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 3.03 कोटी महिलांना मदत, 26 आठवडे सशुल्क प्रसुती रजा. मध्यमवर्गीय जीवन सोपे झाले असून 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण कर सवलत, मेट्रो सुविधा 20 शहरांमध्ये पोहचली,UDAN योजनेमुळे 1.16 कोटी लोकांना स्वस्त हवाई प्रवासाचा लाभ घेता आला,100+स्मार्ट शहरांमध्ये 7800 प्रकल्पांची अंमलबजावणी, एप्रिल 2022 मध्ये GST अंतर्गत नंतरचे सर्वाधिक रू 1.87 लाख कोटींचे मासिक कर संकलन, आयुष्यमान भारत अंतर्गत 10.7 कोटी कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण आणि 4.5 आणि कोटी लोकांना मोफत उपचार मिळाले, 9300 हून अधिक जन औषधी केंद्रावर स्वस्त औषधे उपलब्ध आहेत, वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी रुपये 64 हजार 180 कोटींची तरतूद, 1. 59 लाखाहूनअधिक आयुष्यमान भारत आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रे , जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीम अंतर्गत 220 कोटी हून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत 5.65 कोटीहून अधिक माता आणि बालकांना लस संरक्षण मिळाले आहे, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, कोरोनाच्या काळात वंदे भारत मिशन अंतर्गत 2.97 कोटी भारतीयांचे परत येणे सुनिश्चित केले आणि युक्रेन आणि येमेनमधून 27,000 हून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली, भारताची सुरक्षा मजबूत झाली 2014 पासून कोणत्याही मोठ्या शहरात (संघर्ष क्षेत्र वगळता) एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही , कलम370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाली आहे, वसुधैव कुटुंबकम या थीमवर भारताने G - 20 शिखर परिषदेचे 2023 चे अध्यक्षपद स्वीकारले, डिजिटल व्यवहारात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास- पी एम गती शक्ती मास्टर प्लॅनची स्थापना, 2014 पासून वाहतूक आणि महामार्ग बजेटमध्ये 500 टक्के वाढ, राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा वेग 208% वाढवून दररोज 12 किमी वरून 37 किमी प्रतिदिन झाला आहे, जागतिक दर्जाची वंदे भारत ट्रेन सुरू झाली आगामी काळात एकूण 400बांधण्यात येतील, विमानतळांची संख्या दुप्पट 74 वरून 148 वर, ईशान्य कडील राज्यांचा ऐतिहासिक विकास- आसाम मधील सर्वात लांब बोगीतील पुलाचे बांधकाम आणि सुबनसिरी लोअर येथे दोन हजार मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प, आदिवासी आसाम शांतता करार आणि बोडो नागा, कार्बी शांतता कराराने ईशान्येत शांतता प्रस्थापित केली, ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिरेकी घटनांमध्ये 76 % घट, सांस्कृतिक वारसाचे नवीन युग-अयोध्येतील श्री
रामजन्मभूमी मंदिर आणि काशी विश्वनाथ आणि उज्जैन महाकाल मंदिरात भव्य कॉरिडॉरचे बांधकाम, सोमनाथ आणि केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार , आदिवासी स्वाभिमान दिन आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित 10 आदिवासी संग्रहालये, सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले गेले इत्यादि माहिती पत्रकात देवून घरोघरी पत्रके भाजपा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने देत आहेत. असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....