ब्रम्हपुरी:-ऑल इंडिया चेस फेडरेशन (AICF) व महाराष्ट्र चेस असोसीएशन (MCA)अंतर्गत ब्रम्हपुरी तालुका बुध्दीबळ संघटना " च्या वतीने दि.११व१२जानेवारी २०२५ ला दोन दिवसिय "श्रीमती अरुणाताई देविदासजी जगनाडे स्मृती ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा" विठ्ठल रुख्मिणी सभागृह,आरमोरी रोड,ब्रम्हपुरी येथे आयोजीत करण्यात आली. स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आली असून या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात , छत्तीसगड, पंजाब, उत्तर प्रदेश, त्रीपुरा, मध्यप्रदेश, कर्नाटक व झारखंड येथिल एकूण २३१खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री अशोकजी रामटेके माजी उपाध्यक्ष न.प.ब्रम्हपुरी, स्वागताध्यक्ष मा.श्री नारायणजी बोकडे , उद्घाटक मा.श्री सुखदेवजी प्रधान प्रमुख अतीथी मा. प्राचार्य डॉ देविदासजी जगनाडे साहेब स्पर्धा प्रायोजक,मा.प्रा.उमेशचंद्र मिश्रा,मा.प्राचार्य डाॅ.एन.एस.कोकोडे सर, टुर्नामेंट डाय.श्री हरिश्चंद्र चोले संस्थापक सचिव ,प्राचार्य सतिश शिनखेडे , मा.श्री दिलीपरावजी जगनाडे ,मा.श्री गोकुलदास खोब्रागडे व श्री विनोबा मेश्राम हे होते. स्पर्धेची प्रस्तावना व उद्धेश श्री हरिश्चंद्र चोले सरांनी सांगितले. तर मान्यवरांनी बुद्धिबळ खेळाचे महत्त्व सांगून खेळाडूंना प्रोत्साहित केले . संचालन श्री दशरथ बांडे व आभार श्री तुळशिरामजी सपाटे यांनी केले व पहिल्या दिवशी खेळास सुरुवात करून दिली.स्पर्धा निरीक्षण IA श्री प्रविण ठाकरे (जळगाव) चिफ आर्बिटर व IA श्री दिपक चव्हाण (नागपूर) ऑर्बिटर व FAश्री शिवा अय्यर ,FA गायत्री पाणबुडे,SNA श्रिकांत बागडे,SNA शितल पाणबुडे आर्बिटर,SNAश्री रितेश उरकुडे(ब्रम्हपुरी)ऑर्बिटर व टुर्नामेंट सचिव आदित्य दुपारे , टुर्नामेंट सहसचिव मुकुल बरडे व टुर्नामेंट कन्व्हेनर निलेश बांडे यांनी केले.
१ल्या दिवसी पाच व दुसऱ्या दिवशी चार अशा एकुण ९फेऱ्या पुर्ण करीत टुर्नामेंट कन्व्हेनर श्री निलेश बांडे यांनी सर्व आरबिटरच्या साहाय्याने बुद्धिबळातील स्पर्धेची सांगता केली. स्पर्धेतील विजेते बुद्धिबळपटू :-प्रथम क्रमांक-FM सुयोग वाघ अहमदनगर (८),द्वितीय क्रमांक -IM रामनाथम बालाशुभ्रमन्यम,चेन्नई (७.५), तृतीय क्रमांक-शौनक बडोले नागपूर (७.५) बेस्ट ब्रम्हपुरी खेळाडू प्रथम-रजत कामडी(६.५),द्वितीय-प्रदिप बावनकुळे (६.५),तृतिय-वेदांत बांडे (६).स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांचे एकूण ५५ बुद्धिबळ पटूंना रोख पुरस्कार व १०२ आकर्षक चषक विविध गटात देऊन सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. .बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ देविदासजी जगनाडे मुख्य स्पर्धा प्रायोजक,बक्षिस वितरक मा. डॉ प्रेमलाल मेश्राम,प्र.अतिथी मा.श्री अश्विनजी मुसळे ,I A श्री प्रविण ठाकरे चिफ.आरबिटर,श्री दिपक चव्हाण डे.चिफ.आरबिटर, श्री बाळुभाऊ राऊत ,श्रीमती स्वाती खंडाळकर , प्रा.मोतीलाल दर्वे, श्री प्रकाश वैद्य,हे उपस्थित होते.राष्ट्रीय स्तरावरील ह्या स्पर्धेत आपल्या भागातील स्पर्धकांनी अधिकाधिक संख्येने भाग घेण्याची ही उत्तम संधी होती, राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन सतत होत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलेत. पारितोषिक वितरण सोहळ्याचे संचालन प्रा.मनिषा गेडाम, प्रास्ताविक श्री हरिश्चंद्र चोले व आभाराचे विशेष श्रेय प्राचार्य डॉ देविदासजी जगनाडे यांना देउन श्री दशरथ बांडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आश्रयदाते, पुरस्कारदाते, व देणगीदार यांचे जाहीर प्रकटन करून BTCA चे सर्वस्वी प्रा. सुयोग बाळबुद्धे,दामोधर बावनकुळे, माहादेवजी दर्वे, आकाश खंडाळकर ,जुबेर रय्यानी, सुभाष ठवरे, भगवान खोडवे, विनोद चिंचेकर, सचिनभाऊ राऊत, मोरेश्वर राऊत, उत्तम कोसे,व कैलास समर्थ , यांचे उपस्थित बुद्धिबळ स्पर्धेची सांगता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....