अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांसाठी संपूर्ण भारतभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला , जिल्हा क्रीडा विभाग व पतंजली परिवार अकोला च्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दि.21 जून ते 23 जून 2024 सकाळी ८ वाजता दिव्यांग बांधवांसाठी विशेष योग कार्यशाळेचे आयोजन अकोल्यात प्रथमच करण्यात आले आहे .सांस्कृतिक सभागृह , क्रीडा संकुल , रामदास पेठ अकोला येथे होऊ घातलेल्या या योग कार्यशाळेत दिव्यांग व सर्वसामान्य व्यक्तींनाही निःशुल्क योग प्रशिक्षण दिले जाणार आहे . निरोगी जीवनासाठी योग साधना , योग व रोजगार निर्मिती , दिव्यांग बांधवांसाठी योग प्रशिक्षक अभ्यासक्रमाची माहिती अशा विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्याने देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे . सदर कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.सतीश भट , श्री.सुहास काटे , सौ.भारती शेंडे , सौ.श्रद्धा मोकाशी , डॉ.राजेश भोंडे व डॉ.विशाल कोरडे उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेसाठी दिव्यांग व सर्वसामान्य नागरिकांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदणी करून कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजन समितीचे हरीश पारवानी, मनीषा कुलकर्णी, अनामिका देशपांडे, प्रतिभा काटे, पूजा गुंटीवार, संजय तिडके, अरविंद देव, व विजय कोरडे यांनी केले आहे .