कोरची तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील बेडगाव पोलीस मद केंद्रातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेडगाव- बोरी फाट्यावर सकाळी ७ वाजता नाकेबंदी दरम्यान सुगंधित तंबाखू व चार चाकी कारसह ७ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
कोरचीवरून भरधाव वेगाने कुरखेडाकडे जात असलेली MH 36 AL 0756 क्रमांकाची संशयित रेनॉल्ट ट्रायबर कंपनीची कार बेडगाव ते बोरी फाट्याजवळ बेडगाव पोलिसांनी पहाटे दरम्यान नाकाबंदी असतांना अडवली. पोलीस उपनिरीक्षक प्रबोधन जोंधळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवलेल्या वाहनाची तपासणी केले असता वाहनात अवैध सुगंधित तंबाखू असल्याचे आढळून आले.सदर कारमध्ये दहा बोरी भरून होत्या त्या उघडून बघितल्या तर त्यामध्ये होला हुक्का कंपनी नावाचे तंबाखू पाकीट बोरीत भरून होते. अशा दहा बोरीमधील तंबाखूची किंमत एक लाख ६४ हजार रुपये तर चार चाकी वाहन सहा लाख रुपये असे एकूण सात लाख ६४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
आरोपी राकेश मनोहर जागिया वय ४२ रा. सेंदुरवाफा, ता. साकोली, जि... भंडारा किराणा व्यापारी याचे विरोधात कोरची पोलीस स्टेशनमध्ये अवैध तंबाखू वाहतूक केल्याबाबद कलम २७२, २७३ गुन्हा दाखल करण्यात आले. या गुन्हाचे अधिक तपास कोरची पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलीस उपनिरीक्षक प्रबोधन जोंधडे हे करीत आहेत.