तालुका आरमोरी येथे सर्वात मोठा तालुका क्रीडा संकुल असून त्यात दररोज क्रीडाप्रेमी सरावासाठी येत असतात तसेच अवती भवतीचे प्रौढ नागरिक सायंकाळी फिरायला येत असतात .मात्र पायाभूत गरजा क्रीडागणात दिसत नाही त्यामुळे खेळाडू व नागरिकामध्ये नाराजी दिसत आहे.
खेळाडू यांच्या प्रतिक्रियावरून क्रीडागनावर 6 महिन्याअगोदर संकुलात शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले असून बंदवस्थेत आहे. त्यामुळे हयगय होते.
तालुका क्रीडा संकुलात असलेल्या शौचालय हे दुरून बघितल्यानंतर पूर्णवस्थेत असल्याचे दिसून येते आणि जवळ जाऊन बघितल्यानंतर मलमूत्र साठी असलेले पाईप हे वर दिसून येतात त्याचा कोणत्याही गटाराशी जोडलेला दिसत नाही त्यामुळे शौचालयचे बांधकाम अंदाजपत्रक तयार करतांना गटाराविना बनविले का असा प्रश्न पडतो आणि त्या अंदाजपत्रकाला मान्यता कशी मिळाली अशी शंका येते. यावरून एक शोभेची वस्तू दिसत आहे. त्यामुळे सरकारी कामावर नाराजी व्यक्त होत आहे.
*जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, वरील बांधकाम हे DPDC अंतर्गत असून अपुऱ्या निधीमुळे काम अपूर्णांवस्थेत आहे लवकर पूर्ण करण्यात येईल*
सदर बांधकाम करतांना अंदाजपत्रक नुसार तयार करण्यात येतो आणि त्यात सर्व पायाभूत सुविधा पुरविणे महत्वाचे असते तर निधीनुसार बनविणे महत्वाचे असते मात्र वरील शौचालय हे अंदाजपत्रकानुसार बनविले नसून त्यात गटार चोरीला गेलेले असेल अशी शन्का क्रीडाप्रेमी व नागरिक करीत आहेत.