चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला भद्रावती पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या त्याच्याकडून ११ मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या गणेश प्रल्हाद आडे (३२) रा. हनुमाननगर भद्रावती असे आरोपीचे नाव आहे. भद्रावतीचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अमलदार शशांक बदामवार यांनी माहितीच्या आधारे गणेश आडे याला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच त्याने भद्रावती, चंद्रपूर शहर, रामनगर, वणी, यवतमाळ या भागातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.