कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रकाश वासुदेवराव लिंगाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान इतर कोणाचाही अर्ज न आल्याने लिंगाटे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
या निवडीमुळे समितीच्या कार्याला नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया सदस्यांनी दिली. उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर प्रकाश लिंगाटे यांनी सर्व संचालक व सभासदांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या हितासाठी व बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली यावेळी आमदार तथा सभापती सईताई प्रकाश डहाके, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, देवव्रत डहाके,खरेदी विक्री अध्यक्ष अरुण ताथोड, कृ.उ. बा. स. संचालक दिनेश राठोड, नितीन नेमाने, बाबुराव चौधरी, विजय हिवाळे, वीरेंद्र चारथळ, प्रवीण वानखडे, देवेंद्र राऊत, श्रीमती सुनंदा गुंजाटे, सौ कावेरी पारे, अरुण वानखडे, रवींद्र घुले, बालचंद्र जाधव, साहेबराव तुमसरे, ब्रिजमोहन मालपाणी, अनिल पाकधणे, हसन चौधरी उपस्थित होते.यावेळी निवडणूक प्राधीकृत तथा सहाय्यक निबंधक अधिकारी(प्रशासन ) जिल्हा उपनिबंधक सहकारी वाशिम आर. आर.सावंत उपस्थित होते.
चौकट.:-
मताची वजाबाकी न पाहता दिलेल्या शब्दावर ठाम राहून अल्पसंख्यांक बोद्ध समाजाचे असताना आपल्याला दिलेला शब्ध पाडून उपसभापती पदी विराजमान करणाऱ्या डहाके परिवाराचे आपण आभारी आहो सोबतच प्रकाशदादा डहाके यांच्या स्वप्नातील कृषी उत्पन्न बाजार समिती उभी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्रधान्याने सोडवीण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून सभापती सईताई प्रकाश दादा डहाके यांना कायम सहकार्य करू डहाके परिवाराने दिलेला शब्ध पाडून तालुक्यातील जनतेचा विस्वास जिंकला त्यामुळे मी त्याचे ऋणी आहे.