अर्ध अल्बिनो प्रकारात साप तसे दुर्मीळच आहेत. त्यातही डुरक्या घोणस प्रजातीत हा प्रकार अद्याप गडचिरोली जिल्ह्यात आढळलेला नाही. परंतुजिल्ह्यातील आरमोरी येथे हा साप आढळून आला. जिल्ह्यात पहिल्यांदाच दुर्मीळ अर्थ अल्बिनो डुरक्या घोणस सापाची नोंद वनविभागात झाली. आरमोरी येथील नितीन गोंदोळे यांच्या घरी साप असल्याची माहिती येथील सर्प अभ्यासक देवानंद दुमाने यांना फोनद्वारे मिळाली. त्यानुसार सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. नंतर त्यास जंगलात सोडले. येथील वन्यजीवरक्षक देवानंद दुमाने, दीपक सोनकुसरे, करण गिरडकर, वसीम शेख, नितीन गोंदोळे उपस्थित होते.