अकोला - केंद्रातील नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार आणि राज्यातील देवेंद्र जी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार च्या लोकाभिमुख विकास काम आणि अकोला पूर्व चे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून घुसर चे माजी सरपंच आणि जेष्ठ शिवसैनिक जगदीश नारायणराव पागृत यांच्यासह पुरुषोत्तम पागृत,राजू विश्वनाथ सिंग लहरिया,राजू पाटील भगत यांनी आज आ.सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायम कार्यरत असणारे आमदार रणधीर सावरकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी कार्यासाठी सक्रिय कार्यरत राहू असे यावेळी जगदीश पागृत यांनी आपले मत मांडले.
यावेळी महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,विजय अग्रवाल,तालुकाध्यक्ष देवेंद्र देवर,अनिल गावंडे,राजेश बेले,कुश माहोरे,सचिन पगृत,बाबुलाल कांगटे,भालचंद्र पागृत,चंदूभाऊ खडसे,मोहन पागृत,सुभाष रायबोले,नारायण बोर्डे,अंकुश पाटील,हर्षल गोंडचवर,सुनील पागृत,सचिन बेहरे,राहुल वाकोडे,रोहित पागृत,कुलदीप पागृत,विठ्ठल कांगटे,रामेश्वर डाहाके आदी पदाधिकारी व घुसर परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....