कारंजा तालुका प्रतिनिधी-येत्या रविवारी म्हणजे 7 जानेवारी रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत स्वा.से.श्री.क.रा. इन्नानी महाविद्यालय,कारंजा येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे.
स्वा.से.श्री.क.रा. इन्नानी महाविद्यालय कारंजा या महाविद्यालयाचे सुरुवातीचे नाव विद्याभारती वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय कारंजा हे होते. या महाविद्यालयात 1983 पासून तर 2023 पर्यंत शिकत असलेल्या सर्व वरिष्ठ महाविद्यालक्यातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 7 जानेवारी रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर माजी विद्यार्थी मेळाव्याला या काळातील सर्व प्राध्यापक तसेच या काळातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
सदर मेळाव्याची रूपरेषा खालील प्रमाणे आहे. नऊ ते दहा वाजेपर्यंत नोंदणी,दहा ते अकरा उद्घाटन, अकरा ते साडेबारा पर्यंत जे माझी विद्यार्थी वरिष्ठ पदावर आहे त्यांचे प्रेरणादायी मनोगत, साडेबारा ते दिड वाजेपर्यंत जेवण, दीड ते साडेतीन पर्यंत माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, साडेतीन वाजता समारोप कार्यक्रम.
तरी ज्यां माजी विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी रविवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक देवरे तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर राऊत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देवानंद बोन्ते व सचिव प्रा.अतुल बर्डे, उपाध्यक्ष विलास कथले, कोषाध्यक्ष सुरेश गुगलिया, प्रसिद्धी प्रमुख विजय भड व सर्व सदस्य यांनी केले आहे.