अकोला :-भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय गिताई सभागृह, जुने
शहर अकोला. येथे लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त कॉ. रमेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटना, युथ फेडरेशन, किसान सभा या संघटनांनी वैचारीक आदरांजली सभेचे आयोजित केले होते. सर्व प्रथम कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला कॉ. रमेश गायकवाड, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला कॉ. मायावती बोरकर तर विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला कॉ. नयन गायकवाड यांनी हारार्पण केले. प्रास्ताविक शालू नाईक यांनी केले कॉ. मायावती बोरकर, कॉ. सविता प्रधान, कॉ. उषा अहिर, कॉ. पुनम खोब्रागडे युथ फेडरेशन, यांनी गाणे पोवळे सादर करत अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत म्हनाले की, शेवट पर्यंत अण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते आणि आम्ही सुद्धा तोच आदर्श घेवून पक्ष व जनसंघटने बरोबर राहू कॉ. नयन गायकवाड यांनी कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकुण पोवाळ्यांचे माहितीपर भाषण देताना म्हणाले की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा भारत किंवा महाराष्ट्रात नव्हे तर रशिया या देशात उभा केला आहे रशियाच्या शासकीय ग्रंथालयात अण्णा भाऊ साठे ग्रंथ व माहिती दिलेली आहे, अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियामध्ये गेले होते तेव्हा रशियामध्ये त्यांनी मराठी या भाषेतच रशिया गाजवली होती त्यावेळेस सुद्धा भाषावाद नव्हता परंतु आताचे राज्यकर्ते नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस सरकार भाषा व दाद भाषेचे जनतेत तेड निर्माण करून विविध ठिकाणी त्याचे रूपांतर उग्र स्वरूपात होत असून सरकारने यातून बोध घ्यावा महाराष्ट्र व भारतीय जनतेने भाषावाद, जातीवाद, भांडवलशाही वाद प्रहार करून भारतीय कम्युनिस्ट पक्षात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या त्यांचा त्याग, संघर्ष व पक्ष निष्ठा ह्या गोष्टींचा आदर्श उपस्थितांनी घ्यावा असे आवाहन केले, तसेच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी कामगार कष्टकरीचे लढे देवून कामागर कायदे निर्माण केले परंतु भा.ज.प. चे केंद्र व राज्यातील सरकार ने कायदे बदल करत भाषा वाद निर्माण करून जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत किमान वेतन अधिनियम कोड मंजुर करून ५० करोड कामगारांवर अन्याय केला आहेत व IBC भारतीय नादारी कायदा २०१६ कोड भांडवलदारांच्या बाजुने कायद्या केलेला या कायद्या विरोधात देश भर आंदोलन करुण महाराष्ट्र सरकारने विधयक मंजुर करू नये अशी मागणी करण्यात येणार आहे. शेवटी सभेचे अध्यक्ष कॉ. रमेश गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी श्रमिक, दलीत, पिडीत यांचे जिवनाचा प्रत्यक्ष अभ्यास करुन त्यांचे वर साहीत्य लिहले तसेच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कला पथकाच्या व्दारे पूर्ण महाराष्ट्र पिंजुल काढला व त्या वेळेस मुंबई सह महाराष्ट्र निर्माण झाला, उपस्थितानी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना लाल सलाम लाल सलाम, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अमर रहे अमर रहे असे गगणभेदी नारे लावण्यात आले. सभा संपल्यानंतर सिटी कोतवाली येथील कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य अभिवादन रॅलीमध्ये सहभागी होऊन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. सभेत रमेशभाऊ गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, मायावती बोरकर, सविता प्रधान, शालुताई नाईक, वारके बापू, छाया वारके, सुनीता मुरुमकार, मंदाकिनी आगरकर, पद्मा गोळे, वर्षा चवरे, अलका उन्हाळे, रश्मी मेश्राम, सुप्रिया मेश्राम, अंकिता रिंगणे, किरण कैथवास, रंजिता समुद्रे, मृणाली रामटेके, वैशाली भेदे, फौजिया खान, उषा अहिर, रामनारायण धनोकर, प्रीती संजय अंबरकर, पूनम खोब्रागडे, रितू धम्मपाल घ्यारे इत्यादीसह सभेला उपस्थित होते अशी माहिती
कॉ. नयन गायकवाड भाकप
आयटक उपाध्यक्ष अकोला, उपाध्यक्ष वाशीम, बुलढाणा, अकोला कामगार वकील संघ . यांनी कळवली
आपल्या प्रतिक्रिया द्या....