समाजात वाढत असलेले स्त्रियावरील अत्याचारविरोधात समाज प्रबोधनाचे कार्यक्रम म्हणून जोगीसाखरा येथील श्री गणेश मंडळ कुणबी मोहल्ला वतीने मस्कऱ्या गणेश उत्सव निमित्याने प्रबोधनकर एम के. जादूगार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तीन तासाच्या कार्यक्रमात अनेक जादूचे प्रयोग करून समाज प्रबोधन केले. त्यात "मेरे प्यारे भारत मे कोई अच्छा नही"या वाक्याने सुरुवात करून "मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी "या म्हणीचा वापर करून समाजात स्त्रियावर होणारे अत्याचार,स्त्रियांना दिले जाणारे दुय्यम स्थान, स्त्री भ्रूण हत्या या विषयावर विशेष समाज प्रबोधन केले. त्यात कुप्रथा, दारूबंदी आणि विविध विषयावर जण जागृती केली.
या एकपात्री कार्यक्रमासाठी श्री बाल गणेश मंडळ कुणबी मोहल्ला येथील तरुण वर्गाने सहकार्य केले. आणि मंडळाच्या वतीने एम के जादूगार यांचे आभार मानले.