अकोला:-
अखिल विश्वाला निरामय आरोग्यासाठी संजीवन योगमार्गाची दिक्षा.. भेट बहाल करणाऱ्या भारतीय ऋषी-मुनी योगींना साष्टांग दंडवत सारा जग करत असल्याची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 126 देशांमध्ये आज जागतिक योगा दिवस म्हणून साजरा करून भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार केला असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडी नेत्या सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे यांनी केले.
स्थानिक रामनगर येथे भारतीय योग संस्था आयुष्य मंत्रालय अकोला शाखा च्या वतीने योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, जयंत मसने, प्रशांत अवचार, रश्मी अवचार,राजेंद्र लाडखेडकर सौ सुषमा लहरिया विजय गोखले सौ रोहिणी गोंधळेकर सौ मीना खंडेलवाल विनोद काळे माधव मानकर व भारतीय योग संस्था चे सर्व सहकारी उपस्थित होते .
केवळ आजच नाही तर नित्त्य घडोत योगासने.. !!
योग.. हे सूक्ष्म अध्यात्म विद्याही आहे.. विज्ञानही आहे.. चिकित्सा पद्धतीही. योग ही भारतात पाच हजार वर्षे असलेली.. जगाला या भारतीय संस्कृतीने दिलेली जीवनशैली भेट. मुख्य म्हणजे ही भेट जात.. धर्म.. पंथ.. गरीब.. श्रीमंत, भौगोलिक सीमा कुंपण ओलांडणारी सर्वांसाठी आहे. असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
नियमितपणे योगासने केल्याने तणाव कमी होणे, शरीराची लवचिकता वाढ, एकाग्रता वाढ हे फायदे होत निरोगी जीवनशैलीने जगण्यास मदत होते. योग हे शरीर, मन, भावना आणि ऊर्जेच्या पातळीवर कार्य करते. कर्म योगात शरीराचा, भक्ती योगात भावनांचा.. ज्ञान योगात मन आणि बुद्धीचा वापर होतो. याचे योग्य संयोजन गुरू शिकवतात असे याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच लाख लोकांच्या सोबत आज कार्यक्रम करून जागतिक विक्रम केले आहे अशीही खासदार धोत्रे म्हणाले.
आज भारतीय संस्कृतीची मुल्ये ही जगमान्य झालीत. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असलेली योग गीता ही फक्त भारताजवळच आहे. आमच्या वेद.. पुराणे सर्वच धर्मग्रंथात योग महात्म्य वर्णन आहे.
गीतेत सांगितलेल्या विस्तृत योगमहात्म्याने श्रीकृष्णाची ओळख योगेश्वर म्हणून जगात आहे. भगवान शंकर तर योगअवस्थेत विराजमान असतात. आमचे सगळेच ऋषी.. मुनी.. संत योग जाणायचे. ज्ञानेश्वर माऊलींना योगीराज म्हणतात तर संत गजानन महाराजांना योगीराणा. असे सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर म्हणाल्या.
योग ही अध्यात्म विद्या आहे, जी विज्ञानही आहे आणि चिकित्सा पद्धतीही आहे, हे सर्वप्रथम स्वामी विवेकानंद.. अरविंद घोष यांनी जगाला सांगितले. अलिकडे हे जगाला पटले. भारताच्याच मागणीने २०१५ पासून २१ जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून जगभर संपन्न होतोय. योग ही भारताने जगाला अर्पण केलेली निरामय आरोग्याची मोफत उपचाराची सर्वात मोठी भेट. आज म्हणूनच ॐ कार जगभर निनादतो आहे. असे भाजपा हा महानगराध्यक्ष जयंत मसने म्हणाले,
योग म्हणजे जीवात्मा आणि विश्वात्मा यांच्यातील एकत्व अनुभवणे. आनंदी जीवनासाठी निरामय शरीरस्वास्थ आणि तणावरहित शांत मनस्वास्थ हवे. मग गरीब असो वा श्रीमंत सर्वांनाच आनंदी जीवन लाभण्यासाठी उपयुक्त असा मोफतचा राजमार्ग अर्थातच योगमार्ग.असल्याचे मीना खंडेलवाल यांनी याप्रसंगी सांगितले.
*योगाचे ज्ञानयोग, भक्तीयोग, हटयोग, कर्मयोग, राजयोग, मंत्रयोग, नादयोग, लययोग इ. प्रकार आहेत. तर पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे अष्टांग योग सांगितले आहेत.असे राजेंद्र लाळ खेडकर यांनी महत्त्व सांगितले
*आपल्या देहामधे असणारा आत्मा म्हणजे प्रत्यक्ष देवच निवास करतो. त्यामुळे हा देह म्हणजे देवाचे मंदिर आहे, ऊसामधील लपलेल्या साखरेप्रमाणे किंवा ताकात लपलेल्या नवनीताप्रमाणे हा देव दडलाय. त्यामुळे देवाला इतरत्र शोधायला जावू नका असे म्हणतात. असे रोहिणी गोंधळेकर यांनी सांगितले
त्याकरिता या देहाला निरोगी ठेवायला हवे. त्याला दुःख देणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुःख देणे म्हणून मन निरोगी.. निष्पाप.. निर्मळ हवे. त्या देहातील देवाचे पूजन करावयाचे असेल तर योगमार्गाचा अवलंब हवा. या जिवात्म्याला परमात्मा भेटीसाठी योग हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.असल्याचे सुषमा लहरिया यांनी सांगितले
आता अभ्यासक्रमातच योग विषय समाविष्ट होत आहे. जगाला मार्गदर्शन करणारे योग शिक्षक भारत पुरविणार आहे. जगातील सर्वाधिक निरोगी व्यक्तींचा देश ही भारताची ओळख आहे.असल्याचे विजय गोखले यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने योग अभ्यासक तसेच योगा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....