नागभिड----चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आणि विकासपुरुष म्हणून जनमानसात प्रख्यात असलेले मा.किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्य नागभीड तालुक्याच्या वतीने रुख्मिणी सभागृह येथे कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले गेले.आपल्या बंटीभाऊ चा वाढदिवस म्हणून तालुक्यातील पदाधिकारी पासून सर्वसाधारण कार्यकर्त्याने आमदार भांगडिया यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. आमदारांचे सभागृहात आगमनत होताच आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दीपत प्रज्वलित करून अभिवादन केले. आणि पदाधिकारी यांनी आणलेला केक कापला. तालुक्यातील पदाधिकार्यांनी आमदार बंटी भांगडिया यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.

तर तालुक्यातील व्यापारी संघटना,मॉर्निंग वॉक संघटना, अधिवक्ता संघटना, पञकार बंधु ,तरंगिणी डान्स अकादिमी नागभीड,ओबीसी आघाडी,युवा मोर्चा आघाडी, महिला आघाडी तसेच अन्य संघटनेच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जमलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांना संबोधताना आपण विरोधकांच्या विरोधाला न जुमानता असेच निस्वार्थ भावनेने नेहमी आपल्या विधानसभेत जनहिताचे कार्य करण्यास कधीही मागे पडणार नाही. तर मला मिळालेले जनतेचे हे अथांग प्रेम हेच माझ्यासाठी अनमोल आहे. असे विचार प्रकट केले. आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले. तर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वाढदिवसानिमित्य नागभीड तालुक्यातील २५० गरजू महिलांना शिलाई मशीन, २५० विद्यार्थांना सायकल व ६० प्रथम जन्मास आलेल्या कन्येला रोखे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला ,वसंत भाऊ वार्जुरकर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य,राजूभाऊ देवतळे प्रदेश उपाध्यक्ष, उपाध्यक्ष,गणेश तर्वेकर चिमूर विधानसभा प्रमुख,संतोष रडके तालुकाध्यक्ष,इंदुताई आंबोरकर महिला आघाडी अध्यक्षा , आवेश पठाण सभापती कृषी बाजार समिती,रमेश बोरकर उपसभापती कृषी बाजार समिती,सचिन आकुलवार समन्वयक अध्यक्ष, मडावी माजी सरपंच चिखलगाव,उमाजी हिरे माजी नगराध्यक्ष,देवानंद बावनकर भाजयुमो अध्यक्ष,जगदीश सडमाके तालुका महामंत्री,सुनील शिवणकर तालुका महामंत्री,रुपेश डोर्लीकर तालुका महामंत्री,सोनू कटारे,जहांगीर कुरेशी,धनराज बावनकर,राजेश घिये,रमेश पा.बोरकर,अरविंद भुते,धनराज काटेखाये,हनीफ भाई जादा,मा.कंकाळ साहेब मुख्याधिकारी न.प.नागभीड,आनंद कोरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,ईश्वर मेश्राम माजी सभापती,संजय घोनमोडे माजी सभापती,डी.टी.बोरकर जेष्ठ नेते,कृष्णाजी सहारे,नितूताई येरणे शहर अध्यक्ष,हेमंत नन्नावरे शहर अध्यक्ष,दिपाली ताई मेश्राम माजी जि.प.सदस्य,दशरथ उके माजी नगरसेवक,पद्माताई कामडीय,अशोक ताटकर तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्खेत उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....