वाशिम : शास्त्रीय संगीत तथा वारकरी संप्रदायातील दिग्गज व्यक्तीमत्त्व पं. सूर्यकांतजी गायकवाड ( गुरुजी ) यांचे पुणे येथे दुःखद निधन. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. शास्त्रीय तथा वारकरी संप्रदायातील संगीत क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणून पं.सूर्यकांत गायकवाड गुरुजी सर्वांना परिचित होते. गुरुजींच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांचा
अंत्यविधी : ०५ फेब्रुवारी २०२३ सकाळी : ९.३० वाजता
पाषाण स्मशानभूमी , पुणे येथे करण्यात आली .त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच, वाशिम जिल्हा गोंधळी समाज संघटना आणि जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाकडून अध्यक्ष तथा दिंडीप्रमुख संजय कडोळे यांनी वारकरी मंडळातर्फे शोक संवेदना प्रगट केल्या आहेत.