कारंजा. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे 02/09/2023 रोजी सायंकाळी 06.30 वाजता शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर शांतता समिती बैठकीच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शहर पो. नी. दिनेशचंद्र शुक्ला,नायब तहसीलदार बनसोड व नगर परिषदचे सहायक कार्यक्रम अधिकारी चव्हाण उपस्थित होते.
आपल्या प्रास्तविकात पो. नी. शुक्ला यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलिस प्रशासनला सहकार्य करण्याचे आवाहन केले तर अध्यक्षीय भाषनात उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांनी कोणत्या ही अफवांना बळी न पडता कारंजा शहरात शांतता क़ायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करुन आगामी सण उत्सव आनंदात साजरे करावे.व उत्सव मिरवणुकित पारम्परिक वाद्याला चालना देऊन नवीन पीढ़ीला चागले संस्कार मिळेल. याची दक्षता घ्यावी. जसे की पारंपारिक खेळ, वाद्य,ढ़ोल ताशा पथक,लेझिम पथक, मल्लखांब, लोककला,सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण यांना प्राधान्य देण्यात यावे.डीजे मुळे नवीन वर्गाला व्यवस्थित चालना,संस्कार मिळत नाही आणि शहराची शांतता भंग होते. त्यामुळे असे कोणतेही कृत्य केल्यास त्याला माफ़ी मिळणार नाही. आम्ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशिरपणे कडक कार्यवाही करू.असे स्पष्ट मत उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी व्यक्त केले.सदर बैठक ही कावड मिरवणूक,पोळा,गणेश उत्सव,व ईद-ए-मिलाद इत्यादी सण उत्सवा निमित्त घेण्यात आली होती.सदर बैठकी करीता कावड मिरवणूक मंडळ,पोळा उत्सव समिती,गणेश उत्सव मंडळ समिती व ईद-ए-मिलाद उत्सव समिती तसेच शांतता समिती पदाधिकारी,पत्रकार मंडळी प्रामुख्याने हजर होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार सवाई यांनी तर आभार स.पो.नी.सुपलकर यांनी व्यक्त केले.