गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात मागील एक वर्षांपासून जंगली हत्तीचे आगमन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस जंगली हत्ती आणि वाघाच्या हल्यात अनेक नागरिकांना जिवही गमावावा लागत आहे. आता काही ठिकाणी पीक नीसवन्यावर तर काही ठिकाणी कापण्यावर येत आहे. अश्यात ह्या हत्तीचा आणि नरभक्षक वाघाचा हौदास वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या हत्ती आणि वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, आतापर्यंत हत्ती, वाघा सह जंगली प्राण्याने ज्या शेतकऱ्याचे नुकसान केले त्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, जंगली प्राण्याच्या हल्यात मयत झालेल्या मृताच्या परिवारास आर्थिक मदत करण्यात यावी, नुकसान भरपाई देत असताना जाचक असलेल्या अटींमध्ये शिथिलथा देण्यात यावी, गडचिरोली वनवृत्तात वन्यजीव विभागाची निर्मिती करण्यात यावी या मागण्याना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी