आरमोरी:-
अनुसुचित जाती, जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमीलेअर लावण्या संदर्भात सुप्रिम कोर्टाने दिलेला १ आगष्ट २०२४ रोजीचा संविधान विरोधी निर्णय संसदेत कायदा करून रद्द कऱण्यात यावा या मागणीसाठी आरक्षण बचाव, संविधान बचाव समन्वय समितीच्या वतीने आरमोरी तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने बुधवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. व मागण्याचे निवेदन तहसिलदार मार्फत राष्ट्रपती याना देण्यात आले. नायब तहसीलदार हरिदास दोनाडकर यानी मोर्चेकऱ्याचे आंदोलनं स्विकारले
आरमोरी येथील तथागत बुध्द विहारातून मोर्चाला सुरवात झाली. सदर मोर्चा शहरांतील प्रमुख मार्गाने फिरून आरक्षण बचाव संविधान बचाव च्या घोषणा देत मोर्चा तहसिल कार्यालयात पोहचला. मोर्चात दलीत, आदिवासी समाजबांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.
देशाच्या सुप्रिम कोर्टातील सात न्यायाधीशाच्या बेंचने १ आगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती-जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलेअर लावणे संदर्भात निर्णय दिला .हा निर्णय संविधान विरोधी असुन, जातीजातीत तेढ निर्माण करणारा आहे. त्यामुळे संसदेत कायदा करून हा निर्णय रद्द करावा व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसुचित टाकावे. जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती जमातीच्या संविधानात्मक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही. अशी भा मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.
निवेदनात अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्य न्यायालयाचा निर्णय रद्द करन्यात यावा.न्यायाधिशांच्या नियुक्तीसाठी कालेजीयम पध्दत बंद करून न्यायाधिशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशीयल सर्व्हिस चे गठन करुन त्यात आरक्षण लागु करावे. एस.सी., एस.टी., ओ.बि.सी., भटक्यांचे आरक्षण कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल ९ मध्ये त्याचा अंतर्भाव करावा. जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी, नुसार जातिनीहाय जणगणना करावी. खाजगी सेक्टर मध्ये सुध्दा आरक्षण लागु करावे. आदी विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. मोर्चात विविध आंबेडकरी, व आदिवासीं संघटना, व विवीध पक्ष सहभागी झाले होते.
मोर्चात डॉ. नीलकंठ मसराम, यशवंत जांभूळकर, प्रकाश पंधरे, किशोर सहारे, धर्माजी.बांबोळे वेणुताई ढवगाये, विजयकुमार ठवरे, भीमराव पात्रिकर,डॉ. शीलु चिमूरकर, नरेन्द्र कोकुडे, ,कैलाश टेंभूर्न,मुरलीधर भानारकर, हंसराज बडोले, वामन राऊत,प्रदीप खोब्रागडे,, सौ.भारती मेश्राम,रविंद्र नैताम, डॉ. प्रदीप खोब्रागडे, प्रदीप कुमार रोडगे,सुनिता कोवाची, विद्या चौधरी, राजेश लिंगायत, अंजली रोडगे, , प्रा. अमरदिप मेश्राम, हीवराज सयाम,खेचरस्वामी कुमरे,दिलीप मडावी,भीमराव मेश्राम,विलास मडावी, रेखा बांबोळे,कुंदा मेश्राम,भावना बारसागडे ,वर्षा खोब्रागडे,अनुराधा रामटेके,शीतल खोब्रागडे,सह दलीत आदिवासी समाजातील महीला पुरुष युवक,आणि युवती मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....