बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र. एम एच ३० एबी २६०२ ही आल्याने सदर वाहनास पोलीस स्टाफने थांबविण्याचा ईशारा दिला. परंतू वाहन चालक वाहन न थांबविता निघुन गेला. वाहन क्र. एम एच ३०एबी २६०२ चा चालक मौजा चंदनखेडी येथील रस्त्यावर वाहन उभी करुन जंगलात पळुन गेला. त्यानंतर पोलीस स्टाफने सदर वाहन चेक केले असता, त्यामध्ये ९०एम एल मापाचे ५५ सिलबंद बॉक्स किंमत ५ लाख ५० हजार रुपये, ३७५ एम एल मापाचे ०५ सिलबंद बॉक्स किंमत ७२ हजार रुपये, बोलेरो मॅक्सी ट्रक बनावट वाहन क्रमांक एम एच ३०एबी ५ लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.