थोर समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद् गाते महात्मा ज्योतिबा फूले जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.सोखी,जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे,श्री.चहांदे,उमाकांन्त चतुर,श्री.साहरे आदी उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.