स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र दिनानिमित्त ३० एप्रिल व १ मे २०२२ रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर विशेष व्याख्यान संपन्न झाले.
मूर्तिजापूर येथील व्याख्यान कर्त्या सौ. लता किडे यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक नेताजी सुभाष चंद्र बोस व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. नेताजी यांनी इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन भारताच्या बाहेर जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना कशी केली? याचा धगधगता इतिहास मांडला. महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकारी चळवळ काव्यरचना व त्यांनी राष्ट्रासाठी केलेला त्याग या विषयावर व्याख्यान सादर केले.सदर कार्यक्रमातून युवा पिढीपर्यंत स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आहुती टाकणार्या कर्मवीरांची माहिती विस्तृतपणे मांडण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी कुळकर्णी व अनामिका देशपांडे यांनी केले.महाराष्ट्राची संस्कृती नृत्यातून जान्हवी कुळकर्णी हिने सादर केली*.*संस्थे तर्फे आयोजित १२ जून २०२२ रोजी ओपन थेटर येथे होणाऱ्या चॅरिटी शो मध्ये दिव्यांग बांधवांना व्हिल चेअर उपलब्ध करून देण्यासाठी सौ.लता किडे यांनी संस्थेला देणगी दिली*.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.विशाल कोरडे, प्रसाद झाडे, रागिणी किडे ,स्वाती झुनझुनवाला ,स्मिता अग्रवाल ,यांनी सहकार्य केले.