गडचिरोली,(जिमाका)दि.04: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली अंतर्गत सुरु असलेल्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,सेमाना बायपास रोड, आनंदनगर, गडचिरोली येथे शैक्षणिक सत्र 2022-23 करीता इयत्ता 1 ली मध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज संबंधित पालकांकडून ऑनलाईन मागविण्यात येत आहे. इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म 01 ऑक्टोंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2016 या कालावधित असावा. पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
प्रवेश अर्ज आज दिनांक 04 एप्रिल पासुन https://forms.gle/jpr५OjiAWNjXFw९w८ या Google Form वरती ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. गडचिरोली जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील वरील दिनांकात बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी/नातेवाईकांनी सदर लिंक आपल्या Android Mobile किंवा Computer द्वारे भरावयाची आहे. नंतर आपण दिलेल्या माहितीच्या आधारे सर्व पात्र विद्यार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीच्या आधारे निवड करण्यात येईल. प्रवेश अर्जाबाबतच्या अधिक माहितीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.डी.एच.जूमनाके, मो.न.9421813807, ए.आर.कांबळे,(अधिक्षक) 9552014595, कु.एस.एन.झाडे (अधिक्षिका)- 9422978673, वाय.यु.पेंदाम-9359335608, जी.टी.डोंगरवार 9405729912, यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे शाळेच्या मुख्याध्यापिका कु.डी. एच.जुमनाके यांनी कळविले आहे.