मुंबई/कारंजा : कारंजा-मानोरा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांनी विधानभवनात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.
पेरणीचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांची व्यथा जाणून आमदार सईताई डहाके यांनी आज विधानभवनात प्रश्न विचारला आणि नुकसान भरपाईबाबत उत्तर मागितले.
त्यावेळी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना,कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दि. 31 मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाईल,असे आश्वासन दिले.
विधानभवनात पहिलाच शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरणारी, शेतकऱ्यांची खरी जाण असलेली मायमाऊली म्हणून कारंजा मानोराच्या लाडक्या स्थानिक आमदार श्रीमती सईताई डहाके यांची विधानभवनातील कामगिरी दमदार असल्याचे मतदारांनी कबूल केले असून आमदार श्रीमती सईताई डहाके यांचेवर संपूर्ण मतदार संघाच्या मतदारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे. विधानभवनात ताईसाहेबांची कामगीरी अशीच दमदार राहीली तर निश्चितच कारंजा मानोरा मतदार संघाचा विकास लवकरच होणार असून तशी ग्वाही त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दाखवून दिली आहे.