अकोला -- सहकारनिष्ठ पुरस्कारप्राप्त अकोल्यातील मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष व संस्थापक स्व.शांतानंद सरस्वती यांच्या जन्मदिनानिमित्त शालेय विद्यार्थी रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन मोरगाव भाकरे व भौरद येथील शाळांमध्ये करण्यात आले होते.
मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला रजि. नं ३३३ च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नियोजित सामाजिक उपक्रमाचे आयोजन संस्थाध्यक्ष जे.टी वाकडे यांचे अध्यक्षतेखाली महात्मा फुले विद्यालय,मोरगाव भाकरे व जि.प.प्राथमिक शाळा भौरद येथे करण्यात आले होते. म.फुले विद्यालयाचे सचिव दिनेशराव काठोके, प्रमुख अतिथी म्हणून तर मुख्याध्यापक वि.ना.पागृत, रामदास लोड,वंजारी साहेब,भौरद जि.प शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन वाघ,यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जे.टी.वाकोडे यांचे हस्ते म. फुले विद्यालयात शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भौरद येथील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी सर्वप्रथम दिप प्रज्वलन करून म..फुले व संत गाडगे महाराज तथा स्व. स्वामी शांतानंद सरस्वती यांना हारार्पण करून वंदन करण्यात आले.
याप्रसंगी पतसंस्थेचे सचिव डॉ रणजित देशमुख,संचालक सुधीर वाकोडे, संचालक, माजी अध्यक्ष संजय देशमुख, देविदास घोरळ,माणिकराव सरदार,विजय बाहकर, विजय काटे, सुरेश तिडके या संस्था संचालकांची उपस्थिती होती. दिनेशराव काठोके यांनी आपल्या भाषणांमधून पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांची मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे मोरगाव भाकरे येथे आयोजन केल्याबद्दल आभार मानून संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षिय भाषणातून जे टी वाकोडे यांनी संस्थेच्या प्रगतीची आणि शिस्तबध्द आर्थिक वाटचालीची माहिती दिली.
पतसंस्थेचे सचिव डॉक्टर रणजीत देशमुख यांच्या ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या चमुने तपासणी करून शिबिर यशस्वी केले. मोरगाव भाकरे, बाखराबाद, रसुलाबाद, भौरद या गावातील इयत्ता १ ते १० वी च्या बहुतेक विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले विद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी जिल्हा परिषद शाळांचे विष्णू गोलाईत,निता जाधव, भावना अलकरी,सरिता लोहकर दर्शना सोनाग्रे,लता राऊत,वैशाली कुलकर्णी,प्रमोद मोकळकर योगेश देवकते, लीना भाकरे उज्वला शर्मा मीरा डीघोडे,पुष्पा साबे चंद्रशेखर चतारे यांनी प्रयत्न केले. पतसंस्थेचे व्यवस्थापक नरेंद्र डंबाळे, लेखापाल विकी क्षीरसागर आणि वृंदा पवार यांनी उत्कृष्ट नियोजनातून करून शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचलन केन्द्रप्रमुख व मानवधर्म संचालक माणिकराव सरदार यांनी तर आभारप्रदर्शन संचालक,माजी अध्यक्ष संजय देशमुख यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....