पिजदुरा - भटाळा या पांदण रस्त्यावर बांधन्यात आलेल्या पुलाचे बांधकाम अरुंद पाईप टाकल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेत पिकाचे नुकसान झाले , येत्या आठ दिवसात मदत करा अन्यथा सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा
किशोर मधुकर डुकरे , इतर गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे .
पिजदुरा भटाळा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2007मध्ये फुलाच्या बांधकाम केले , या पूलाच्या बांधकामासाठी अरुंद पाईप टाकून पुल बांधण्यात आला, पावसाळ्यात या अरुंद पाईप मध्ये काट्या, प्लास्टिक, जमा झाल्याने त्यातून पाणी जाणे बंद झाले, परिणामी असाळा येथील रहिवासी किशोर डुकरे व इतर शेतकऱ्यांचे शेत नाल्याला लागून असल्याने या पुलाचे पाणी आजूबाजूच्या शेतात गेल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले ,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना विचारणा केली असता झालेले बांधकाम आमचे नाही असे लेखी पत्रद्वारे देण्यात आले, झालेल्या नुकसानाची भरपाई आठ दिवसात देण्याचे यावे,अवैध पुलाचे बांधकाम तोडण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा निवेदनाद्वारेसार्वजनिक बांधकाम विभाग वरोरा. जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वरोरा, पुलिस निरीक्षक , पोलीस स्टेशन, वरोरा यांना देण्यात आला आहे.