अकोला:- चिखलदरा येथे जगप्रसिद्ध गणपती संग्रहालय सुरू करून संपूर्ण भारतात नावलौकिक कमावलेले प्रदीप नंद यांना दिल्ली येथे राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन गौरव नुकताच त्रिमूर्ती भवन दिल्ली येथे श्रीमती नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट व गोल्डन स्पॅरो संस्थेतर्फे देशभरातील 50 नामांकित व्यक्तींना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन गौरवण्यात आले. सोहळ्यात विविध राज्यातील व्यापारी समाजसेवक डॉक्टर वकील शेतकरी दूध व्यवसाय शिक्षक कला संग्रहालय संगणक विज्ञान अवकाश संशोधन मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महामंडलेश्वर श्री पंच दर्शन नाम जुना आखाड्याचे स्वामी वीरेंद्र नंद महाराज सोनम मोनार्क सारनाथ प्रमुख अतिथी प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा चंद्रन भरतनाट्यम डांसर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत आर जे आरती मल्होत्रा यांनी केले. तर संचालन डॉक्टर टिळक यांनी केले. प्रदीप नंद यांच्या गणपती संग्रहालय यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला तेव्हा गणपती बाप्पा मोरया मोरयाच्या घोषणा जयघोषाने सभागृह दुमदुमला होता. प्रदीप मधुसूदन नंद यांच्या नंद गणपती संग्रहालय अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तीन एकरात वसले असून सात दालनामध्ये 6000 गणेश मुर्त्या विराजमान झालेल्या आहेत. त्यात गवताच्या अतिशय बारीक पात्यावर होणाऱ्या गणरायाचे दर्शनासह धान्याची दाणे खडू यावर देखील मंगलमूर्तीचे दर्शन घडते. चंदन, चांदी, पितळ, तांबे, लोखंड, काच, ग्रॅनाईट, लाकूड, फायबर, मोती, शिंपले, रुद्राक्ष इतकेच नव्हे तर पेन्सिल साबण शर्टची बटन अशा विविध वस्तूवर अतिशय सूक्ष्म स्वरूपापासून ते सहा फुटात उंचीपर्यंत असणाऱ्या सुखकर्त्यांचे दर्शन मेळघाट चिखलदरा लगत असणाऱ्या मोथा या ठिकाणी गणपती संग्रहालय उघडलेले आहे. प्रदीप नंद यांना रियल लाईफ सुपर हिरो राजमुद्रा असलेला चांदीचा शिक्का देऊन राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन केला. व नंतर श्री गिरीराज महाराज यांनी प्रदीप नंदन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.