कारंजा : जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज संपुर्ण देशामध्ये गेल्या ७५ वर्षापासून अविरत व निरंतर कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशाप्रती आत्मीयता निर्माण व्हावी व भारतीय संस्कृती बद्दल जागरुकता पसरवण्याचे कार्य विविध उपक्रमाद्वारे करीत असते. स्वामी विवेकानंद ह्यांना आपले प्रेरणास्थान मानून त्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावे ह्या करीता सतत प्रयत्नशील कार्य करीत असते.
त्याचेच औचींत्य साधून स्वामी विवेकानंद जयंतीच्या पावन पर्वावर आयोजित युवा महोत्सवानिमित्त अभाविप ची गतिविधि सेवार्थ विद्यार्थी व कारंजा रक्तदान चळवळीच्या संयुक्त विद्यमाने आई कामक्षा माता मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कारंजा तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती. डॉ. जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. रागिणी राठोड, मातृशक्ती कारंजा प्रखंड संयोजिका सौ. रुपाली बाहेती, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अजय कांत तसेच कामक्षा माता मंदिर येथील दिगंबर महाराज हे उपस्थित होते. तसेच अभाविप चे वाशिम जिल्हा संयोजक सुमित बरांडे ह्यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमास हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ ह्यांचे हारअर्पण व पूजन करून करण्यात आले.
रक्तसंकलन डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला च्या टीम द्वारे करण्यात आले. ह्या वेळी एकुण ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ह्या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरीता संपुर्ण अभाविप कारंजा नगर च्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्याचप्रकारे सर्व रक्तदात्यांचे आभार सुध्दा मानण्यात आले.