कारंजा : दि.१४/०९/२०२२ रोजी प्रहार जनशक्ति पार्टीच्या वतीने प्रहार सेवक महेश राऊत यांनी येवता मंडळातील असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांसह, जिल्हाधिकाऱ्यांना, निवेदन दिले असून अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊनही येवता मंडळ अतिवृष्टीतील लाभापासून वंचित राहत असल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्टपणे इशारा दिला आहे. तसेच येवता महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्र तातडीने बदलून नवीन यंत्र बसून देण्याची मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली.
येवता मंडळ येथे येत असलेल्या ग्राम, कामठवाडा, आखतवाडा, जांब, गंगापूर, वैतखेड, सोमठाणा, येवता, धोनी ममदाबाद, खेर्डा (जिरापुरे), इत्यादी तसेच ईतर ऐकून १६ गावातील ,तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील शेतातील उभी पिके, दि.११/०९/२०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाली आहेत त्यामुळे झालेल्या उभ्या पिकांच्या नुकसानाबाबत तात्काळ पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी व येवता मंडळ हे अतिवृष्टीमध्ये जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
मागणीचे निवेदन मा.आ. राजेंद्रजी पाटणी साहेब, जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा कृषि अधिकारी साहेब, सडीओ साहेब, तहसिलदार साहेब, तालुका कृषि अधिकारी साहेब यांना देण्यात आले. असून शेतकऱ्यांनी निवेदनावर सह्या केल्या असून निवेदनात सविस्तर अशे की,
आम्ही सर्व शेतकरी बांधव, येवता मंडळ अर्ज सादर करतो की, सर्व शेतकरी बांधवाचा शेती हाच एकमेव व्यवसाय कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे . अश्या स्थितीत दि. ११/०९/२०२२ रोजी, जी अतिवृष्टी झाली त्यामुळे सर्व शेतकर्यांच्या शेतातील उभ्या सोयाबीन, तुर, कापूस, उडीद, मुंग, अश्या पिकांचे मोठ्या प्रमाणात म्हणजेच जवळपास *१००%* नुकसान झालेले आहे. उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने आता आमच्या उत्पनात मोठया प्रमाणात घट झाली आहे व परिणामी आमच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही या अतिवृष्टीमुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे मा. शासन - प्रशासनामार्फत तात्काळ आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे होऊन तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत नुकसानभरपाईद्वारे मिळणे आवश्यक आहे, तरी आम्ही सर्व शेतकरी बांधव मागणी करतो की आमच्या शेतीचे पंचनामे होऊन आम्हा सर्व शेतकऱ्यांना मा. शासन - प्रशासनाद्वारे नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्यात यावा तसेच संपूर्ण येवता मंडळ हे अतिवृष्टी धारक क्षेत्र जाहीर करण्यात यावे व भूमिपुत्रांना साथ देण्यात यावी, असे न झाल्यास/ अन्यथा प्रहार जनशक्ति पार्टीतर्फे तीव्र जनआंदोलन उभे करण्यात येईल , याची नोंद घ्यावी.
त्याचबरोबर आम्हाला येवता महसूल मंडळ येथे जे पर्जन्यमापक यंत्र आहे ते नादुरस्त असल्याने ते यंत्र नवीन बसवण्यात यावे,
कारंजा - मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्रजी पाटणी साहेबांचे निवेदन भाजपा तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे यांनी स्वीकारून साहेबांसोबत दूरध्वनीद्वारे सम्पर्क साधून निवेदनातील नमूद विषय त्यांना सांगितला त्यावर त्यांनी अतिवृष्टी ग्रस्थ शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानाविषयी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुचना देतो अशे सांगितले तसेच अतिवृष्टी ग्रस्त झालेले क्षेत्र वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल , व आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव आहे व राहील असे त्यांनी सांगितले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....