उद्या दिनांक २ जून २०२३ रोज शुक्रवारला ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती द्वारा भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चा हुतात्मा स्मारक येथून सकाळी ९ वाजता सुरू होऊन एस.डी.ओ. कार्यालय इथपर्यंत जाणार आहे.
ब्रम्हपूरी जिल्हा झालाच पाहिजे ही सर्व सामान्य जनतेची मागणी आहे,मी स्वतः या साठी आग्रही आहे.मात्र जनभावनेचा उद्रेक होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही.ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती ब्रम्हपुरी द्वारा आयोजित या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करीत आहे.
मोर्चाला भाजपाचे जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी, भाजपा,भाजयुमो,महिलाआघाडी ओबीसी आघाडी,आदिवासी आघाडी, अनुसूचित आघाडी, सर्व शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,इ.उपस्थीत राहावे असे तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे सर यांनी देखील आवाहन केले आहे.