अकोला - महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मेळाव्यात मुकनायक पत्रकार दिन पंचायत समिती सभागृहात साजरा करण्यात आला.
यावेळी पत्रकार, साहित्यीक कलावंत यांचा यावेळी सन्मान प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नायब तहसिलदार मनोहर नागे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन सहाय्यक अधिकारी श्री शेळके, शिवसेना शहर प्रमुख योगेश अग्रवाल, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख, प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. पप्पू मोरवाल उपस्थित होते.
यावेळी मुकनायक पत्रकार दिनानिमित्त प्रमुख पाहुणे यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
पत्रकार विभागीय मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पी.टी. धांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विकास देशमुख यांनी केले. यावेळी अकोला शहर अध्यक्ष विलास इंगळे, सुबोध वानखडे, वैभव मनियार, प्रमोद धर्माळे, शिवाजी खरात, ज्ञानेश्वर निखाडे, दयाराम काळे, रामकृष्ण डोंगरे, सिद्धार्थ तायडे, राजकुमार वानखडे, मंगेश देशमुख, गोपाल देशमुख, राजेश वानखडे, मंगला गवई, पद्मा टेकाडे, गोपाल अग्रवाल, विजय कुचे, संदीप देशमुख, जुनेद खान, ताराचंद पालीवाल, सिद्धार्थ खंडारे, शेख सादिक, शेख खालीद, विजय तेलगोटे आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती
आपल्या प्रतिक्रिया द्या....