गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात जनावरं चोरट्यांनी (Stealing gang) चांगलाच धडाका लावला आहे. दरम्यान, तालुक्यातील बिहाडी येथील शेतकर्याची बैलजोडी अज्ञात चोरट्याने चोरली. या प्रकरणी शेतकर्यांने कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली.
कारंजा पोलिसांनी येथील अजय उर्फ छोटू चरडे, त्याचा मित्र कामडी या दोघांनी बैलजोडी चोरून आणून निखील वरठी (23) रा. साईनगर वडधामणा, गुणवंता चरडे (45), राकेश चरडे (21) पारडसिंगा, मोहम्मद साहेल आसिफ खान (22), इरफान कुरेशी प्यारे कुरेशी (33) रा. अनसाननगर मोहमीनपुरा नागपूर या 7 जणांना कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरट्यांनी बिहाडी येथील बैलजोडी चोरी केल्याची कबुली दिली. यात एक बैलाची कत्तल करण्यात आली तर एक बैल मिळून आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद वानखडे, गुड्डू थुल, निखील फुटाणे, उमेश खामनकर यांनी केली. तालुक्यात जनावरे चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. यात नारा,वाघोडा, तरोडा यासह इतर गावातील जनावरे चोरीला गेल्या आहे.