कारंजा : स्थानिक माऊली सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिंडीप्रमुख सुरेशभाऊ गढवाले हे दरवर्षी, जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी, श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव देव पर्यंतच्या, माऊली श्री मुंगसाजी महाराज यांच्या पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करीत असतात. चालू वर्षी रविवारी दि १ जानेवारी रोजी श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव देव पर्यंत पालखी पदयात्रा संपन्न झाली . सदरहु पदयात्रेत अंदाजे तिन ते साडे तिन हजार वारकरी भाविकांनी हजेरी लावून पदयात्रा संपन्न केली होती. त्यानिमित्त आज दि ३ जानेवारी रोजी पहाडपुरा येथील सुरेशभाऊ गढवाले यांचे निवासस्थानी भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला . यावेळी भजनीमंडळांसह हजारो वारकरी मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच पालखीचे भोई, भालदार, चोपदार, मानकरी, भजनीमंडळ, तसेच हभप. सुधाकर महाराज किन्हिकर ( किर्तनकार ), हभप संजय म. कडोळे ( प्रबोधनकार ), हभप भगवानदास खेमवानी, पत्रकार विजय खंडार, महाराष्ट्र न्यूज 24 चे विनोद गणवीर इत्यादी मंडळीचा शेला नारळ देऊन सुरेशभाऊ गढवाले यांचे हस्ते सत्कार करण्यात आली. सदर्हु कार्यक्रमा करीता योगेश गढवाले, रुपेश गढवाले व माऊली सेवा समितीचे वारकर्यांनी अथक परिश्रम घेतले.