आरमोरी - तालुक्यातील गरजु गरीब अल्पभुधारक विधवा राहते मातीचे घर गेल्या अतिवृष्टी मुळे घरे पडलेल्या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान, यशवंतराव चव्हाण रमाई व शबरी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन कामाला सुरूवात झाली. मात्र अजूनपर्यंत पाच ब्रास रेती मिळत नसताना प्रशासनाकडून घरे बांधकाम पुर्ण करण्यासाठी तगादा लावला असल्यामुळे घरकुल लाभार्थी अडचणीत सापडले असल्याने या गरजु गरीब लाभार्थ्यांना त्वरित रेती उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, माजी पंचायत समिती सदस्या वृदाताई गजभिये यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थ्यांनी गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार डॉ नामदेवराव किरसान व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कडे जोगी साखरा गावाला भेट दिली असता केली आहे.
केंद्र व राज्य शासन यांच्या माध्यमातून गोरगरीब, मागासवर्गीय अल्प भूधारक विधवा व दारिद्रयरेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच राहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना व अनुसुचित जातीसाठी रमाई घरकुल योजना तसेच अनुसुचित जमातीसाठी शबरी घरकुल आणि भोई समाजासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल अशा विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी शासनाने आरमोरी तालुका २ हजार ६५४, देसाईगंज १ हजार ७३८, कुरखेडा ५ हजार ३० कोरची १ हजार ६२४ धानोरा ३ हजार ८७९ असे तालुका वाईज घरकुल मंजूर करुन मोठ्या प्रमाणात घरकुलाचे कामेही सुरू करण्यात आले यात मंजुर झालेल्या प्रत्येक घरकुलाला पांच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता परंतु शासनाच्या वतीने अजुन पर्यंत मोफत पांच ब्रास मिळणे सुरू न झाल्याने तालुक्यासह ईतर तालुक्यातील घरकुल लाभाथ्याचे घरकुल रेती अभावी अर्धवट राहिले आहेत आता दोन महिन्यात पावसाळा सुरू होतो या महिन्यात रेती मिळाली तर ठिक नाहीतर घरकुल लाभार्थ्यांना निवारे अभावी पावसाच्या पाण्यात भिजण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे गरजु गरीब लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरीता पाच ब्रास मोफत रेती देण्याचे आदेश त्वरित देवुन लाभार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. सध्या रेतीचे भाव वाढलेले असुन रेती घेणे सध्या घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून निश्चितपणे अडचणीचे आहे. मोफत रेतीमुळे त्यांचा आर्थिक भार कमी होतो त्यासाठी गरजु लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरिता तत्काळ पाच ब्रास रेती उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, आरमोरी पंचायत समितीच्या मा.सदस्या वृदाताई गजभिये यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थ्यांनी गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार डॉ नामदेवराव किरसान व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कडे जोगी साखरा गावाला भेट दिली असता केली आहे.