अनेक भागातील शेती पिकांना मिळाले जीवदान तर रखडलेल्या पेरण्या चालू आठवड्यात पूर्ण होणार.!
नदीकाठावरील शेतपिकांचे झाले अतोनात नुकसान.अनेक शेत जमिनीला आले तलावाचे स्वरूप. . वाशिम* : एकीकडे कोकण किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्रात सततधार पाऊस कोसळत असतांनाच विदर्भाकडे मात्र पावसाने पाठ फिरवील्याचे दिसून येत होते.पाऊस होईल.या आशेने काही शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपलेल्या असतांना, अनेक भागातील पेरण्या चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत रखडलेल्या होत्या.मात्र विदर्भातील ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या त्यांना व ज्यांच्या पेरण्या बाकी राहील्या त्या सर्वांना पावसाची प्रतिक्षा होती.विदर्भात काटेपूर्णा धरण व इतरही अनेक धरणामध्ये पंधरा वीस दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्याच्या वार्ता येवून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाणीपुरवठ्यातही कपात केली जात होती.असे असतांना अनेक शेतकऱ्यावर पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ येणार की काय ? ह्या चितेंत शेतकरी राजा सापडला असतांनाच अखेर दि. २४ जून २०२५पासून भौगोलिक वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन,विदर्भाकडे मोसमी पावसाने वेगाने आगेकूच करीत मराठवाडा-विदर्भात दमदार हजेरी लावली.दि.२५ व दि.२६ जून रोजी सुद्धा अनेक भागात जोरदार पाऊस होऊन नदीनाल्यांना पुरस्थिती निर्माण झाली होती. पाश्चिम विदर्भातील वाशिम,रिसोड,मालेगाव मधील नदीकाठच्या शेतजमिनी पावसाने रखडल्या गेल्या असून त्यांच्या शेतात पाणीच पाणी साचल्यामुळे,त्यांचेवर दुबार पेरणीची वेळ येऊन नुकसान भरपाईची मागणी पुढे येत आहे. कारंजा मानोरा परिसरातही चांगला पाऊस झाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. सर्वत्र पावसामुळे उकाड्या पासून वैदर्भिय जनतेला दिलासा मिळाला असून,त्यामुळे एकंदरीत चांगले वातावरण तयार झाले आहे,दि.३० जून पर्यंत विदर्भात भाग बदलवीत समाधान कारक पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी वर्तविला आहे.या संदर्भात यापूर्वीच,चालू जून महिन्याच्या उत्तरार्धात चांगला पाऊस होऊन,सर्वत्र पेरण्या होतील.असा अंदाज जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेले रुई गोस्ता येथील शेतकऱ्यांचे लाडके हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी मे महिन्यात सांगीतला होता. त्यांचे आता पर्यंतचे सर्वच अंदाज अचूक ठरले असून त्यांच्याच अंदाजावर आधारीत,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष असलेले शेतकरी मित्र,संजय कडोळे यांनी दैनिक विश्वजगत; दैनिक मातृभूमि ; दैनिक सत्यजित ; दैनिक विदर्भ कल्याण ; साप्ताहिक करंजमहात्म्य ; युवाक्रांती समाचार इत्यादी द्वारे प्रकाशित केलेली हवामान अंदाजाची बातमीपत्रे तंतोतंत खरी ठरल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहेत.असे वृत्त ज्येष्ठ शेतकरी प्रा.अशोकराव उपाध्ये यांनी दिले आहे.