वाशिम : वाशिम जिल्ह्याचे सुपूत्र असलेले शेतकरी ग्रामस्थांचे लाडके हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी चालू आठवड्यात दि.12 मे 2024 ते दि.17 मे 2024 पर्यंत मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असून,या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी भ्रमणध्वनिवरून बोलतांना होणाऱ्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त करतांना सांगितले होते की, "लागोपाठ उठणाऱ्या चक्रवातामुळे आणि वातावरणात प्रचंड उष्णता वाढलेली असल्याने पाऊसमानाला पूरक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे चालू आठवड्यात दि.12 मे 2024 ते दि. 17 मे 2024 पर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र,गोवा आणि मध्यप्रदेशातही प्रचंड वारे वादळ,विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क रहावे." आज दि.12 मे 2024 रोजी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामधील बहुतांश जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम ते चांगला पाऊस झाला असून अनेक ठिकाणाहून तसे वृत्त मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर,जेजूरी, अहिल्या देवी होळकर नगर,पुणे शहरात व खेडोपाडी मुसळधार पाऊस होऊन नदीनाल्यांना पूर गेले आहेत . त्यामुळे हवामान अभ्यासक गोपाल विश्वानाथ गावंडे पाटील यांच्या अचूक अंदाजाचा पुन्हा एकदा प्रयत्न आला असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी दिलेले असून येत्या 17 मे 2024 पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज कायम राहणार असल्याचे सांगितले आहे .