अकोला - स्व. रजनीबाई रामगोपाल तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट व मृत्यूंजय आयुर्वेद यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक 06 सोमवार, 07 मंगलवार ऑक्टोंबर 2025 रोजी सायकाळी 4 ते 7 वाजे प्रर्यत कोजागिरी पौर्णिमा निमित्त दमा रुग्नांना आयुर्वेदिक औषधांचे वितरण करण्यात येणार आहे.कोजागिरी पौर्मिणेला दमा औषध घेण्याला विशेष महत्व असल्याने .याचा लाभ दमा आजाराने ग्रस्त असलेल्यांना मिळावा या हेतुने सामाजिक भावनेतून गिरीश तोष्णीवाल दरवर्षी कोजागिरी पौर्णीमेला दमा आजाराने त्रस्त असलेल्यांना निशुल्क औषधीचे वितरण करतात.शहरातील व बाहेरगावातील दमाग्रस्त आयुर्वैदिक औषध घेतात. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. र. रा. तोष्णीवाल चॅरिटबल ट्रस्ट व मुत्यूंजय आयुर्वैद तर्फे निशुल्क औषध वितरण कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आली असून यंदाही मोठ्या प्रमाणावर औषधाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती गिरीश तोष्णीवाल यांनी दिली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही स्थानिक टॅावर चौकातील शास्त्री स्टेडियम येथील मुत्यूंजय आयुर्वेद येथे दिनांक 6,7 आक्टोबर 2025 ला कोजागिरी पौर्णिमेला दुपारी 4 ते 7 वाजे पर्यंत दम्याच्या औषधांचे निशुल्क वितरण करण्यात येणार आहे. दमाग्रस्तांनी लवकरच नोंदणी करुन औषधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.