शिंदे-प्रभारी शिक्षणाधिकारी-आहाळे साहेब उपशिक्षणाधिकारी, गवई वेतन पथक अधीक्षक, कु.अर्चना सावदेकर मॅडम लेखाधिकारी,यांनी समाधानकारक स्पष्टीकरण देऊन समस्या सोडविण्यासाठी केले आश्वस्त
वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ): वाशिम जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी बुधवार दि.9/8/2023 रोजी महात्मा फुले सभागृह,जिल्हा परिषद, वाशिम येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मा.किरणराव सरनाईक, शिक्षक आमदार,अमरावती विभाग यांनी नुकतेच पार पाडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण विभागातील विविध समस्यांना विधान परिषदेमध्ये प्रभावीपणे सादर करून शासनाला जाब विचारलेला आहे.बुधवार दि. 9ऑगस्ट रोजी,वाशिम जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी तथा इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये आधार वैधता,संच मान्यता दुरुस्ती,सातवा व सहावा वेतन आयोग हप्ते,वरिष्ठ व निवड श्रेणी अरिअर्स,भ.नि.नी. वैद्यकीय प्रलंबित देयके,अकरावी प्रवेश, एनपीएस खाते तसेच पावत्या वितरण,नवीन शाळांचे अनुदान आदेश वितरण,शालार्थ प्रस्ताव, इत्यादी अनेक समस्या या सभेमध्ये मांडण्यात आल्या. मा. किरणराव सरनाईक यांनी या सर्व समस्या अनुक्रमाने मांडून प्रभारी शिक्षणाधिकारी शिंदे , शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आहाळे, वेतन पथक अधिक्षक
गवई यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या समस्याबद्दल स्पष्टीकरण विचारले.तसेच त्या सोडविण्याबाबत अवगत करीत मार्गदर्शन केले.ज्या काही समस्या प्रलंबित आहेत त्या भविष्यात राहू नये याबद्दल सुचित केले. यावेळी बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींनी त्यांच्या वैयक्तिक समस्या सुद्धा या ठिकाणी सादर केल्या.या समस्यांचा सुद्धा निपटारा करण्यासाठी शिक्षक आमदार मा.किरणराव सरनाईक यांनी उपस्थिती अधिकाऱ्यांना सुचित केले.यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद नरवाडे सर, विजय शिंदे सर,मंगेश धानोरकर सर,विजुक्ताचे जिल्हाध्यक्षअनिल काळे सर, प्रशांत कव्हर सर,कायंदे बाबूजी, अविनाश भाऊ पसारकर, डॉ.मोहम्मद वकार सर, प्रकाशजी कापुरे,अमरावती विभागीय शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन कोरडे,शिक्षक आघाडीचे रमेश आरु सर, विवेकानंद ठाकरे सर तसेच अनेक सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनी कर्मचारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा.शिंदे साहेब, आहाळे साहेब,गवई साहेब , सावदेकर मॅडम यांनी उपस्थितांचे शंका निरसन केले व मा. किरणराव सरनाईक यांना अशी ग्वाही दिली की,भविष्यात शक्य तेवढ्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न कार्यालयातून केला जाईल. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींनी समाधानाची भावना व्यक्त केली. मा.किरण सरनाईक यांनी यावेळी सर्व उपस्थितांना आवाहन केले की,
भविष्यातही आपल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या आपण सादर कराव्यात.यावेळी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे सचिव भास्करराव सोनूणे सर यांनी आपल्या समारोपिय भाषणामध्ये उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....